आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आपले घर नेहमीच व्यवस्थितीत ठेवावे. लोक असे करतात कारण घरातील वस्तू हाताजवळ मिळतील. त्याचसोबत घरात सर्व वस्तू नीट ठेवल्या तर तुम्ही सुद्धा घरात कंम्फर्टेबल फिल होतात. मात्र तुम्हाला माहितेय का याचे फायदे काय होतात. (Organised home benefits)
-तणाव कमी होतो
जेव्हा घर अस्वच्छ आणि व्यवस्थितीत नसते तेव्हा व्यक्तीला आपले घर पाहून स्ट्रेस येऊ लागतो. तुमचे कधी लक्ष गेले नसेल की, अस्थावस्थ झालेले घर पाहून कोणत्याही व्यक्तीचा मूड अपसेट होतो अथवा खुप राग येतो. परंतु घर व्यवस्थितीत लावलेले असेल तर ते पाहून रिलॅक्स वाटते. तुमचा मूड ही सुधारला जातो.
-प्रोडक्टिव्हिटी वाढते
ऑर्गेनाइज्ड घरात सकारात्मकतेसह प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढली जाते. खरंतर घरात जेव्हा सर्व गोष्टी आपल्या जागेवर व्यवस्थितीत ठेवल्या जातात तेव्हा त्या शोधण्यासाठी अधिक वेळ लागत नाही. ना अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे वेळ वाचतो आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढली जाते.
-एकाग्रता सुधारते
जेव्हा घर व्यवस्थितीत आणि नीटनेटके लावलेले असते तेव्हा तुमची एकाग्रता वाढते. त्यामुळे एखाद्या कामावर किंवा प्रोजेक्ट्सवर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. खासकरुन घरातील काम असो किंवा अभ्यास करणे.
-स्वच्छता करणे होते सोपे
स्वच्छता करणे असा एक टास्क आहे ज्यासाठी तुम्ही तुमचा सर्व वेळ खर्च करता. मात्र जेव्हा घर व्यवस्थितीत लावलेले असेल तेव्हा ते स्वच्छ करताना सुद्धा काही समस्या येत नाहीत. स्वच्छता करताना वस्तू तुम्हाला रि-अरेंज कराव्या लागतात.
-उत्तम झोप लागते
घरातील सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थितीत ठेवता तेव्हा शांत आणि उत्तम झोप लागते. घरातील खोली स्वच्छ असेल तर तेथे सकारात्मक उर्जा ही अधिक वाढलेल्या असतात. अशातच तुम्हाला झोप ही उत्तम लागते.
हेही वाचा- ‘या’ गोष्टी एकत्र करून बनवा Homemade धूप