बऱ्याच लोकांना गार्डनिंगची किंवा बागकामाची आवड असते. आपल्या आजूबाजूला हिरवळ निर्माण करणे, झाडे लावणे आणि त्यांची काळजी घेणे यामध्ये अनेकांना आनंद आणि समाधान मिळतो. बऱ्याच लोकांना मोकळ्या वेळेत गार्डनिंग करायला खूप आवडते. हा केवळ छंद नसून, ते मानसिक ताणतणाव देखील कमी करण्याचा एक मार्ग आहे. परंतु बऱ्याचदा आपल्याला गार्डनिंग ऑर्गनाइज कसं करायचं हे कळत नाही. गार्डनिंग ऑर्गनाइज असणे देखील अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात, बाल्कनीमध्ये गार्डनिंग कसं करायचं.
प्लांट लेआउट करा
बाल्कनीमधली गार्डनिंग ऑर्गनाइज करायची असेल तर, सुरुवातीपासूनच त्याचे नियोजन करावे लागेल. जसे की, प्रथम लेआउटची योजना करा. लेआउट करण्यासाठी, तुमची बाल्कनी किती मोठी आहे,हे आधी तपासून घ्या. त्या प्रमाणे तुम्हाला, रोपांसाठी किती जागा हवी आहे हे कळेल. तसेच, कोणत्या भागात थेट सूर्यप्रकाश मिळतो आणि कुठे सावली येते हे देखील कळते.
योग्य कंटेनर निवडा
बाल्कनी परिसरात बाग तयार करताना, कंटेनरचा आकार खूप महत्त्वाचा असतो. जागा वाचवण्यासाठी तुम्ही उभ्या प्लांटरचा वापर करू शकता. मजल्यावरील जागा वाचवण्यासाठी तुम्ही वॉल प्लांटर्स, रेलिंग प्लांटर्स किंवा टायर्ड स्टँड वापरू शकता. बाल्कनीचे सौंदर्य वाढवण्यासाठी, टेराकोटा पॉट्स, सिरॅमिक आणि फंकी रिसायकल केलेले कंटेनर यांसारख्या गोष्टी वापरू शकता.
फर्निचर वापरा
बाल्कनीमध्ये गार्डनिंग केल्यानंतर भरपूर जागा राहिली असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही काही फर्निचर ऑर्गनाइज करू शकता. बागेत फोल्ड करणाऱ्या खुर्च्या किंवा एक लहान टेबल ठेवू शकता.त्याचप्रमाणे स्टोरेज स्पेस असलेल्या बेंचचा वापर बागकामाची साधने ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो.
वनस्पतींना गटांप्रमाणे ऑर्गनाइज
बाल्कनीमध्ये गार्डन व्यवस्थित ठेवण्यासाठी, तुम्ही काही वनस्पती पाणी, सूर्यप्रकाश आणि मातीच्या गरजेनुसार गटांमध्ये ठेवू शकता. अशाप्रकारे त्यांची काळजी घेणे देखील अवघड जाणार नाही.
वनस्पती ऑर्गनाइज करण्याची पद्धत
तुमची बाल्कनी बाग चांगल्या प्रकारे राखण्यासाठी, आकार आणि प्रकाराच्या आधारावर ते व्यवस्थित ठेवा. उदाहरणार्थ, तुम्ही मागे उंच झाडे आणि समोर लहान झाडे ठेवता. त्याचप्रमाणे, जड भांडीसाठी रोलिंग ट्रे किंवा जंगम स्टँड वापरा.
तुमची बाल्कनी मधले, गार्डनिंग सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही वनस्पती आकार आणि प्रकारानुसार .ऑर्गनाइज करा
हेही वाचा : Winter Destinations : भारतातील टॉप 15 हिवाळी डेस्टिनेशन्स
Edited By : Prachi Manjrekar