Thursday, December 7, 2023
घरमानिनीHealthओव्हरईटींगची 'ही' आहेत कारणे

ओव्हरईटींगची ‘ही’ आहेत कारणे

Subscribe

कधीकधी ओव्हरईटिंगमागे तुमची प्लेट ही कारणीभूत असते. काही वेळेस आपण आपल्या किचनमध्ये मोठ्या आकाराच्या प्लेट्स ठेवतो. खरंतर अशा प्लेट्स मध्ये अधिक जेवण असावे असे वाटत राहते. याच कारणास्तव तुम्ही ओव्हरईटिंग करता. त्यामुळे तुमच्या प्लेटच्या आकारावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. या व्यतिरिक्त अशी कोणती कारणे आहेत जी ओवरइटिंगसाठी कारणीभूत ठरतात हे आपण पाहूयात.

इमोशनल इटिंग करणे
हे अत्यंत सामान्य कारण आहे जे ओव्हरईटिंगसाठी कारणीभूत ठरते. काही लोक तणाव, उदासीनता अथवा एकटेपणा अशा नकारात्मक फिलिंग्सपासून दूर राहण्यासाठी विकेंडला ओवरइटिंग करतात. असे केल्याने भले तुम्हाला काहीवेळ आनंदीत वाटेल. पण सतत असे होत राहिले तर ओव्हरईटिंगची सवय पडू शकते.

- Advertisement -

सोशल प्रेशर असणे
काही लोक सोशल प्रेशरच्या कारणास्तव ओव्हरईटिंग करतात. तुम्ही कधी नोटीस केले आहे का, बहुतांश पार्टी किंवा सोशल फंक्शनमध्ये अधिक खाण्यासाछी प्रेशरसाइज केले जाते. अशातच तुम्ही त्यांना नाही म्हणून शकत नाहीत. त्यामुळे ओवरइटिंग केले जाते.

माइंडलेस इटिंग करणे
जेव्हा तुम्ही माइंडफुल इटिंग करता तेव्हा तुम्ही तुमच्या खाण्यावर लक्ष ठेवता. मात्र काही वेळेस तुम्ही माइंडलेस इटिंग करता अथवा खाताना तुमचे लक्ष प्लेटवर नव्हे तर टीव्ही, कंप्युटर किंवा फोनवर असते. अशातच पोट भरल्यासारखे वाटत नाही.

- Advertisement -

मील्सला स्किप करण्याची सवय
जर तुम्ही कामाच्या नादात किंवा अन्य कारणास्तव मील स्किप करता तेव्हा फार शक्यता असते की, तुम्ही तुमच्या पुढील मील दरम्यान गरजेपेक्षा अधिक खाता. यामुळे प्रयत्न करा की, तुम्ही दिवसभरातील सर्व मील खा. तीन मेन मील्स व्यतिरिक्त मिड मील्स सुद्धा गरजेचे असते.


हेही वाचा- भुक लागली नाही तरी खाण्याचे मन का करते?

- Advertisment -

Manini