Thursday, April 25, 2024
घरमानिनीHealth'या' संकेतावरुन कळते तुम्ही Overeating करताय

‘या’ संकेतावरुन कळते तुम्ही Overeating करताय

Subscribe

आपण बहुतांश वेळा आपल्याल भुक लागली की लगेच पटकन काहीतरी खातो. कधीकधी असे होते पोट भरले असले तरीही टेस्ट बड्स आणि क्रेविंगला शांत करण्यासाठी काहीतरी खातो. तुम्ही सुद्धा असेच करता का? जर हो उत्तर असेल तर तुमची ही सवय योग्य नाही. गरजेपेक्षा अधिक खाणं म्हणजेच ओवरइटिंगमुळे लठ्ठपणा नव्हे तर अन्य प्रकारे सुद्धा आरोग्याला धोका उद्भवतो.

अधिक खाल्ल्याने तुमची झोप ही डिस्टर्ब होऊ शकते. त्याचसोबत पचनासंबंधित समस्या ही वाढतात. ओवरइटिंग हे अन्य काही लाइफस्टाइल डिसऑर्डरचे कारण ही ठरु शकते. अशातच आपण जाणून घेऊयात गरजेपेक्षा अधिक खाल्ल्याने शरिरात वास्तवात काय बदल होतात आणि यामागील कारणं काय याच बद्दल अधिक.

- Advertisement -

-अधिक गॅस आणि ब्लोटिंगची समस्या
अधिक प्रमाणात फूड खाल्ल्याने पाचन क्रियेवर अधिक भार पडतो. तसेच ते पदार्थ व्यवस्थित पचत नाहीत. त्यामुळेच गॅस आणि ब्लोटिंगची समस्या उद्भवते. नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसननुसार, घाईघाईत आणि अधिक प्रमाणात जेवल्याने पोटात गॅस निर्माण होतो आणि पोट फुगत.

-आरोग्यासंबंधित धोका वाढतो
नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार ओवरइटिंगमुळे काही समस्या उद्भवू शकतात. यामध्ये लठ्ठपणा हे सर्वसामान्य समस्या आहे. या व्यतिरिक्त हृदयासंबंधित समस्या, मधुमेह, स्ट्रोक आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर ही वाढण्याची शक्यता असते.

- Advertisement -
overeating
overeating

-हॉट फ्लॅशेज जाणवणे
जेव्हा तुम्ही पदार्थांचे सेवन करता तेव्हा डायजेशन प्रोसेस सुरु होते. ज्यामुळे तुमच्या शरिराचे तापमान वाढले जाते. जर तुम्ही गरजेपेक्षा अधिक खात असाल किंवा अधिक तिखट पदार्थ खात असाल तर खाताना घाम येणे, खुप गरम होऊ लागते. जर तुम्हाला असे वारंवार होत असेल तर लगेच खाण्यापिण्यावर कंट्रोल करा.

-गरजेपेक्षा अधिक आळस, झोप येणे
ओवरइटिंगनंतर लोकांना अधिक सुस्ती, थकवा आणि झोप येऊ लागते. नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिननुसार, ओवरइटिंगनंतर रिएक्टिव हाइपोग्लाइसीमियाची स्थिती निर्माण होते. त्यावेळी खाल्ल्यानंतर तुमची रक्तातील साखर अचानक कमी होते. लो ब्लड शुगर लेवलमुळे लोकांना आळस आणि झोप येते. या व्यतिरिक्त हार्ट रेट ही वाढतो आणि डोकं दुखते.

-हंगर रेगुलेशन डिस्टर्ब होते
घ्रेलिन आणि लेप्टिन हे हॉरमोन भुक नियंत्रित करतात. ग्रेलिंग भुक लागलीय याचे संकेत देते. तर लेप्टिन भुख कमी करते. जर तुम्हाला खुप वेळ झाला आणि भुक लागली असेल तर शरिरात ग्रेलिंगचा स्तर वाढू लागतो. जेव्हा तुम्ही खाता तेव्हा लेप्टिन तुम्हाला सांगते की, तुमचे पोट आता भरलेय. अशातच तु्म्ही ओवरइटिंग करत असाल तर या दोन्ही हार्मोन्सचा स्तर बिघडला जातो. यामुळेच तुमची क्रेविंग्स वाढते आणि खाण्यावर नियंत्रण राहत नाही.

हाय फॅट, सॉल्टेड आणि साखरेचे प्रमाण अधिक असलेले पदार्थांचे सेवन केल्याने डोपामाइन म्हणजेच फीलगुड हार्मोन्स रीलिज होतात. जे तुमच्या ब्रेनमध्ये प्लेजरला अॅक्टिव्हेट करतात. अशातच आपण सर्व हार्मोन्स असंतुलित झाल्यानंतर अधिक खातो. गरजेपेक्षा अधिक खाल्ल्याने भुक अनियंत्रित होते. यामुळे व्यवस्थित न्युट्रिशनल डिफिशियंसीचा सामना करावा लागतो. अथवा अधिक प्रमाणात फॅट आणि कॅलरी घेण्यास सुरुवात करतो.

ओवरइटिंग कसे कराल कंट्रोल?
ओवरइटिंग कंट्रोल करण्यासाठी सर्वात प्रथम हेल्दी फुड्सचे सेवन करा. या व्यतिरिक्त अशा पदार्थांपासून दूर रहा जे तुमची क्रेविंह ट्रिगर करतात. प्रोटीन भरपूर प्रमाणात खाण्यास विसरु नका. त्याचसोबत आपल्या डाइटची क्वांटिटीची सुद्धा काळजी घ्या. आपल्या रुटीनमध्ये हिरव्या भाज्या, फळांचा समावेश करा.


हेही वाचा- बर्फ टाकून उसाचा रस म्हणजे पोटात गडबड

- Advertisment -

Manini