Friday, September 29, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Fashion ओवरसाइज टी-शर्ट अशा प्रकारे करा स्टाइल

ओवरसाइज टी-शर्ट अशा प्रकारे करा स्टाइल

Subscribe

तुम्ही कधी ना कधी तुमच्या भावाचे टी-शर्ट जरुर घातले असेल. असे टी-शर्ट घातल्यानंतर तुम्हाला ज्यांनी कोणीही पाहिले असेल ते नक्कीच हसले असतील. मात्र आजकाल सैल कपडे घालण्याचा ट्रेंन्ड सुरु आहे. यालाच ओवरसाइज कपडे असे म्हटले जाते. (Oversized t-shirt styling)

महिलांमध्ये सर्वाधिक पॉप्युलर ओवरसाइज टी-शर्ट्स आहेत. तुम्हाला सुद्धा फॅशनच्या मार्केट्समध्ये या प्रकारच्या टी-शर्ट्सचे विविध पॅटर्न मिळतील. ओवरसाइज टी-शर्ट्स अत्यंत कूल दिसतात आणि तुम्ही खुप कंम्फर्टेबल ही राहता. परंतु ओवरसाइज टी-शर्ट एकाच प्रकारे घालून तुम्ही कंटाळले असाल तर पुढील काही पद्धतीने स्टाइल करु शकता.

- Advertisement -

ऑफ शोल्डर टॉप प्रमाणे घाला


तुम्ही ओवरसाइज टी-शर्ट ऑफ शोल्डर प्रमाणे घालू शकता. यासाठी तुम्हाला टी-शर्ट एका खांद्याच्या बाजूने खाली करावे लागले. खरंतर ओवरसाइज टी-शर्ट्स हे सैल असतात. त्यामुळे तुम्ही हे ऑफ शोल्डर टॉप प्रमाणे घालू शकता.

- Advertisement -

टक इन करा


तुम्ही टी-शर्टला जीन्स सोबत वेअर करुन कंटाळला असाल तर काहीतरी नवे ट्राय करू शकता. डेनिम स्कर्ट ते शॉर्ट्सवर तुम्ही ओवर साइज टी-शर्ट्स घालू शकता. ते टक इन सुद्धा विविध पद्धतीने करू शकता.

नॉट बांधा


जर तुम्ही फॅशन ट्रेंन्ड फॉलो करत असाल तर आउटफिटला नॉट बांधल्याने सुद्धा कॅज्युअल लूक येतो. खासकरुन ओवरसाइज टी-शर्टला असे केल्यास छान दिसेल.


हेही वाचा- स्टायलिश दिसण्यासाठी ‘हे’ हॉट टॉप्स जीन्ससोबत ट्राय करा

- Advertisment -

Manini