मुलांना उन्हाळ्याची सुट्टी पडल्यावर आपण लगेच कुठेतरी बाहेर जायचं प्लॅनिंग करतो . आपला प्रवास आरामदायी आणि आनंदी बनवण्यासाठी आपण आधीच सीटस् किंवा हॉटेलच बुकिंग करतो. बऱ्याचदा आपण बॅग पॅक करताना काहींना काही विसरतोच. उन्हाळ्यात प्रवास करायचा असेल, तर योग्य पद्धतीने बॅग पॅक करणे महत्त्वाचे असते. गरम हवामान, ऊन आणि घाम याचा विचार करून आपल्याला बॅग पॅक करावी लागते. आज आपण जाणून घेऊयात उन्हाळ्यात कशी बॅग पॅक करायची.
नीट ऑर्गनाइज करा
उन्हाळ्यात बाहेर फिरायला जाताना तुम्ही सर्व गोष्टी नीट ऑर्गनाइज करणे अत्यंत महत्वाचं आहे. यामध्ये तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकत्र करून ठेवा. टूथब्रश, पेस्ट, पेपर साबण, फेस वॉश, फेस क्रीम, लिप बाम आणि टिश्यू पेपर यांसारख्या गोष्टी ऑर्गनायझरमध्ये ठेवा. अशा प्रकारे, तुम्हाला लहान वस्तू काढण्यासाठी संपूर्ण बॅग रिकामी करण्याची काही आवश्यकता नाही.
महत्वाचे कागदपत्र
कधीही कुठेही बाहेर फिरायला जाताना महत्वाचे कागदपत्र घेऊन जायला विसरू नका. टिकिट, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, प्रवास करताना काही महत्वाचे डाॅक्यमेंट्स कॅरी करा.
फेस वाइप्स
उन्हाळ्यात उष्णता खूप असल्याने आपल्याला वारंवार घाम येतो.अशावेळी आपल्याकडे फेस वाइप्स असणे अत्यंत गरजेचं आहे. या फेस वाइप्सचा मदतीने तुम्ही मेकअप क्लीन करू शकतात. या फेस वाइप्सच्या मदतीने तुम्ही हाथ देखील साफ करू शकता.
सनस्क्रीन
उन्हाळ्यात प्रवास करताना किंवा बाहेर फिरताना आपला चेहरा सहजपणे खराब होताे अशावेळी तुम्ही सनस्क्रीन लावल्याने तुमचा चेहरा टॅन होणार नाही. प्रवास करताना दर 2 ते 3 तासांनी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावा.यामुळे त्वचेचे सूर्याच्या किरणांपासून संरक्षण होते. यासह तुम्ही टोपी-छत्री देखील घेऊ शकता. उन्हाळ्यात तुम्ही सुती कपडे घालावेत जेणेकरून तुम्ही आरामदायी राहाल आणि गरम देखील होणार नाही.
सनग्लासेस
उन्हाळ्यात फिरायला जाताना बॅगमध्ये सनग्लासेस ठेवायला विसरू नका. या ऋतूत उष्णतेचा डोळ्यांवरही वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत बॅगेत सनग्लासेस असणे अत्यंत गरजेचं आहे.
पाण्याची बॉटल
उन्हाळ्यात कुठेही प्रवास करताना पाण्याची बॉटल कॅरी करा. याने तुमचं शरीर चांगलं हायड्रेट राहील.
हेही वाचा : Summer Travelling Tips : उन्हाळ्यात या बेस्ट ठिकाणांना द्या भेट
Edited By : Prachi Manjrekar