Friday, April 26, 2024
घरमानिनीHealthलघवी करताना त्रास होतो, मग व्हा सावध

लघवी करताना त्रास होतो, मग व्हा सावध

Subscribe

लघवी करताना काही लोकांना खुप दुखते किंवा जळजळ झाल्यासारखे वाचते. यामागे काही कारणं असू शकतात. यामध्ये युटीआय प्रमुख आहे. आणखी काही इंफेक्शन्सच्या कारणास्तव ही समस्या होऊ शकते. ही समस्या महिला आणि पुरुषांना सुद्धा होते. परंतु महिलांमध्ये ही सामान्य आहे. काही वेळेस लाज वाटत असल्याने त्या याबद्दल उघडपणे बोलत नाही. खासकरुन महिला याकडे दुर्लक्ष करतात. पण वेळीच याकडे लक्ष दिले पाहिजे. लघवी करताना नक्की का दुखते याच बद्दल तज्ञ काय म्हणतात हे पाहूयात.

-ब्लेडर किंवा किडनी स्टोन
हे सुद्धा लघवी करताना दुखण्याचे कारण असू शकते. किडनी किंवा ब्लेडरमध्ये स्टोनची समस्या होणे ही सामान्य बाब आहे. किडनीत होणाऱ्या स्टोनमुळे लघवी करताना सुद्धा ती थांबून थांबून होते. यामुळे सुद्धा युरिन पास करतेवेळी दुखू शकते.

- Advertisement -

-सेक्शुअली ट्रांसमिशेन इंफेक्शन
युरिनमध्ये दुखणे किंवा जळजळ होण्याचे हे सुद्धा कारण असेल. अनप्रोटेक्टेड सेक्सच्या कारणास्तव हे इंफेक्शन होऊ शकते. याची लक्षण वेळीच ओळखली पाहिजेत. कारण इंफेक्शन वाढल्यास तर मुश्किल होऊ शकते. वजाइनामध्ये खाज आणि डिस्चार्ज सुद्धा याची लक्षण असू शकतात.

-युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन
युटीआय महिलांमध्ये होणारी समस्या सामान्य आहे. लघवी करताना जळजळ किंव दुखणे, वारंवार लघवी होणे किंवा रात्रीच्या वेळी लघवीला जाण्याची इच्छा होणे. युरिनवेळी रक्त येणे हे सुद्धा युटीआयची लक्षण आहेत. युरिनरी ट्रॅक्टमध्ये असलेल्या अवयवांमधअये जेव्हा बॅक्टेरिया येतात तेव्हा इंफेक्शन होते. परंतु औषधांच्या मदतीने तुम्ही त्यावर उपचार करु शकता. परंतु हायजीनची काळजी घेणे सुद्धा फार गरजेचे असते.

- Advertisement -

-किडनी इंफेक्शन
लघवी करताना जर तुम्हाला दुखत असेल तर यामागील एक कारण इंन्फेक्शन सुद्धा असू शकते. किडनी इंन्फेक्शनमुळे लघवी करताना दुखते किंवा जळजळ होते. पण याची सुद्धा काही कारणं असू शकतात. मात्र हे त्यापैकी एक आहे.


हेही वाचा- पेल्विक इंफ्लेमेटरी डिजीजचा फर्टिलिटीवर होतो असा परिणाम

- Advertisment -

Manini