संध्याकाळी भुक लागल्यावर अनेकजण वेफर्स, मॅगी, पास्ता असं काहीना काहीतरी खातात. पण हे खाणं हेल्दी मानलं जात नाही. अशावेळी तुम्ही पौष्टिक पालक चकली खाऊ शकता.
साहित्य :
- 4 वाट्या चकलीची भाजणी
- 2 वाट्या पालकाची बारीक केलेली पेस्ट(पालक कच्चाच वापरवा)
- 1 चमचा तीळ
- 2 चमचे हिरव्या मिरच्यांचा ठेचा
- 1/2 चमचा हिंग
- 1 चमचा ओवा
- मोहनासाठी तेल अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी
- चवीपुरते मीठ
- तळण्यासाठी तेल
- 2 वाट्यांपेक्षा थोडे कमी पाणी
कृती :
- सर्वप्रथम पाणी आणि पालक पेस्ट उकळत ठेवावी. त्यात तेल, हिरव्या मिरच्यांचा ठेचा घालावा.
- पिठात मीठ, ओवा, तीळ, हिंग घालून मिसळावे.
- पाणी उकळल्यावर त्यामध्ये पीठ घालून ढवळावे आणि झाकण ठेवावे.
- आता गॅस बंद करून थोड्या वेळाने त्याला तेल-पाण्याचा हात लावून पीठ चांगले मळून घ्यावे.
- चकलीच्या सोर्यामध्ये पिठाचा गोळा घालून चकल्या मंद गॅसवर तळून घ्याव्यात.
- या चकल्यांना छान हिरवा रंग येतो.
- तयार कुरकरीत चकल्यांचा आस्वाद घ्यावा.
- Advertisement -
हेही वाचा :
Moong Daal Samosa : मूग डाळीचा पौष्टिक समोसा नक्की ट्राय करा
- Advertisement -
- Advertisement -