पनीरचे विविध पदार्थ आपण नेहमी ट्राय करतो. आज आम्ही तुम्हाला पनीर कॉर्नची रेसिपी सांगणार आहोत.
साहित्य :
- 100 ग्रॅम किसलेले पनीर
- 1/2 कप कॉर्न
- 8 ब्रेड स्लाइस
- 2 बारीक चिरलेले कांदे
- 1/2 चमचा आलं-लसूण पेस्ट
- 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- 1 लहान चमचा काळी मिरीपूड
- 2 चमचे लिंबाचा रस
- 3 चमचे कॉर्नफ्लोर
- 1 चमचा टोमॅटो सॉस
- मीठ चवीनुसार
- तळण्यासाठी तेल
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम एका पॅनमध्ये 1-2 चमचे तेल घालून मध्यम आचेवर गरम होण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, काळी मिरीपूड आणि लिंबाचा रस घालून 2-3 मिनिटे परतून घ्या.
- नंतर या पॅनमध्ये कॉर्न, पनीर, सॉस आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. तयार मिश्रणाला थंड होऊ द्या.
- एका भांड्यात कॉर्नफ्लोर, मीठ आणि पाणी मिसळून दाट मिश्रण तयार करा.
- आता कढईत तेल घालून मध्यम आचेवर गरम होण्यासाठी ठेवा.
- ब्रेडच्या कडा कापून या ब्रेडला लाटून घ्या. या स्लाइसमध्ये तयार केलेले मिश्रण 1-2 चमचे भरून गोल गुंडाळी करा.
- या रोलला कोर्नफ्लोरच्या मिश्रणात बुडवून तेलात तळण्यासाठी टाका.
- सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. हा रोल हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.
हेही वाचा :