Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min
Ingredients
- 1 ते 2 चमचे मीठ
- 1 चमचा तेल
- पाणी (गरजेनुसार)
- 1 कप किसलेले पनीर
- 1 ते 2 चमचा जिरं
- 1 ते 2 चमचा लाल तिखट
- 1 ते २ चमचा धणे पूड
- 1 ते 2 चमचा गरम मसाला
- 1 ते 2 चमचा आमचूर पावडर
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- 1 ते 2 हिरव्या मिरच्या { बारीक चिरलेल्या }
Directions
- एका परातीत गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल घालून चांगले मिक्स करून घ्या
- त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून मऊसर कणीक मळा
- 15-20 मिनिटे झाकून ठेवा.
- एका भांड्यात किसलेले पनीर घ्या.
- त्यात जिरं, लाल तिखट, धणे पूड, गरम मसाला, आमचूर पावडर, चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
- कणकेचा छोटा गोळा घ्या आणि पुरीसारखा लाटून त्यावर पनीर मिश्रण ठेवा.
- मिश्रण ठेवल्यावर परत गोल आकार देऊन हाताने पुन्हा लाटून घ्या.
- गरम तव्यावर तूप किंवा तेल वापरून पराठा चांगला शेकून घ्या.
- अशा प्रकारे पनीर पराठा तयार आहे.
- हा पराठा तुम्ही लोणी, दही किंवा लोणच्याबरोबर याचा आस्वाद घेऊ शकता.