हल्ली अनेकांना ताणतणाव आणि टेन्शनला समोरं जावं लागतं. घरी किंवा ऑफिसमध्ये कामाच्या टेन्शनमुळे स्वभाव चिडचिडा होतो. अशातच रक्तदाब कमी जास्त होण्याचे प्रमाण देखील वाढते. गेल्या काही वर्षांपासून अनेक वेगवेगळे आजार डोकं वर काढत आहेत. त्यातच आता 'पॅनिक अटॅक'चंही प्रमाण वाढत आहे. आपल्याला अचानक भीती वाटते, सतत कसली ना कसली काळजी वाटू लागते हा 'पॅनिक अटॅक' असू शकतो. 'पॅनिक अटॅक'(panic attack) ही मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आहे. हे ही वाचा - नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून... तणाव आणि मेंदूशी संबंधित समस्यांमुळे कोणत्याही व्यक्तीला पॅनिक अटॅक येऊ शकतो या आजारात मानसिक आरोग्य बिघडून व्यक्तीला अचानक भीती वाटू लागते, व्यक्ती अस्वस्थ होते किंवा व्यक्तीला अचानक भीती वाटू लागते. एखाद्या मोठ्या अडचणीच्या वेळी सुद्धा हा पॅनिक अटॅक(panic attack) येऊ शकतो. हा जरी मानसिक आजार असला तरी त्याचा शरीरावर परिणाम दिसून येतो. या मानसिक आजारातून व्यक्ती हळूहळू सावरते. हे ही वाचा - Receipe : साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळ आलाय? मग या वेळी ‘उपवासाचा ढोकळा’... पॅनिक अटॅकचे कारण एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ असलेला मानसिक ताण हे पॅनिक अटॅक(panic attack) येण्याचे मुख्य कारण आहे. जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून कोणत्ययी समस्येचा सामना करत असेल तर त्यामुळेही पॅनिक अटॅक येऊ शकतो. मेंदूमध्ये असलेल्या सेरोटोनिन नावाच्या रसायनाच्या कमतरतेमुळे सुद्धा ही समस्या उद्भवू शकते. पॅनिक अटॅकची लक्षणं  १ - एखाद्या व्यक्तीला चिंता किंवा भीती वाटू लागते २ - व्यक्तीला मेंदू, हृदय किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये काही काळासाठी वेदना जाणवतात. ३ - ब्लड सर्क्युलेशनवर याचा परिणाम दिसून येतो ४ - व्यक्तीला अशक्तपणा जाणवू लागतो ५ - व्यक्तीच्या हाताचे आणि पायाचे तळवे दुखू लागतात ६ - व्यक्तीच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात ७ - व्यक्तीला भीती वाटून जास्त घामही येतो हे ही वाचा - श्रावणातले उपवासही होतील आणि वजनही कमी होईल, ‘हे’ पदार्थ उपवासाला नक्की खा कोणते उपाय कराल पॅनिक अटॅक आल्यास या काही उपायांनी नक्कीच आराम मिळू शकतो १- दीर्घ श्वास घ्यावा २- पाणी प्यावे ३ - नियमाची योगा करावा हे ही वाचा - तुम्हीसुद्धा फेकून देताय ‘या’ बिया? आरोग्यासाठी आहेत फायदेशीर ४- मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील याकडे लक्ष द्या ५ - तुम्हाला ज्या मधून आनंद मिळतो त्या गोष्टी करा ६ - तुम्हाला आवडणारी गाणी सुद्धा तुम्ही ऐकू शकता