Wednesday, April 24, 2024
घरमानिनीHealthPanty लायनर म्हणजे काय? केव्हा वापरावे?

Panty लायनर म्हणजे काय? केव्हा वापरावे?

Subscribe

सॅनिटरी पॅड्स सारखेच पँन्टी लाइनर्स असतात. पण सॅनिटरी पॅड आणि पँन्टी लाइनर्समध्ये फरक असतो. पँन्टी लाइनर हे अगदी लहान आणि त्याला विंग्स नसतात. तुम्ही याचा वापर पीरियड्सच्या शेवटच्या दिवसांमध्ये करु शकता. कारण त्या दिवशी फ्लो कमी असतो. तुम्ही पँन्टीसोबत ते अटॅच करु शकता. जर तुमचा फ्लो शेवटच्या दिवशी ही अधिक राहत असेल तर याचा वापर अजिबात करु नका. कारण या मध्ये अॅब्जॉर्ब करण्याची क्षमता पॅड्स पेक्षा फार कमी असते. परंतु तुम्ही याचा वापर रेग्युलर दिवसात अधिक डिस्चार्ज होत असेल तेव्हा करु शकता. (Panty liner use tips)

कसे वापर कराल?
याचा वापर करण्यासाठी सर्वात प्रथम लाइनरच्या मागील कागद काढा आणि आपल्या पँन्टीला ते लावा
-याचा वापर जवळजवळ तुमही 2 तासांपर्यंत करु शकता. याचा वापर केल्यानंतर ते कचऱ्याच्या डब्ब्यात थेट फेकण्याऐवजी आधी कागदात गुंडाळा आणि नंतर फेकून द्या.

- Advertisement -

फायदे काय आहेत?
-दुर्गंधी आणि रॅशेजच्या समस्येपासून दूर राहता
-पॅड आणि पँन्टी लाइनर स्किन इंन्फेक्शन पासून दूर ठेवते
-वजाइनला एरिया ड्राय राहतो
-पॅड पीरियड्स दरम्यान ब्लड अॅब्जॉर्ब करण्यासाठी काम करते तर पँन्टी लाइनर तुम्ही सपोर्ट म्हणून वापरु शकता  (Panty liner use tips)

- Advertisement -

झोपताना घालू नका
रात्री झोपताना पँन्टी लाइनर चुकून ही वापरु नका. यामुळे प्रायव्हेट पार्टच्या येथे हवा खेळती राहत नाही. यामुळे समस्या उद्भवू शकतात. त्यामुळेच रात्री झोपतना ते घालू नका.


हेही वाचा- पिरियड लिकेज टाळण्यासाठी वापरा ‘या’ टीप्स

- Advertisment -

Manini