चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई. पपईमध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. इतकंच नाही तर पपईमध्ये ल्युटिन आणि झेक्सॅन्थिन कॅरोटीनोईड्स सारखे घटकदेखील आढळतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. चला तर मग जाणून घेऊया रिकाम्या पोटी पपई खाण्याचे फायदे.
- पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो.
- रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे त्वचेसाठी देखील खूप आरोग्यदायी आहे. याशिवाय शरीर डिटॉक्सही होते.
- पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे.
- जे लोक बऱ्याच काळापासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी नाश्त्यात पपई खावी.
- ज्यांचे कोलेस्टेरॉल वाढले आहे किंवा ज्यांना मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी पपई खूप फायदेशीर ठरू शकते.
- अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपयुक्त आहे.
- रोज सकाळी उठून नाश्त्यात रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास पचनसंस्था मजबूत होईल. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळेल. तसेच तुमचे पोट नियमित स्वच्छ होईल.
हे ही लक्षात ठेवा
- पपईचं अतिसेवन टाळणे गरजेचं आहे. तिच्या अतिसेवनानं शरीरावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात.
- गरोदरपणात कच्ची किंवा अर्धी पिकलेली पपई खाणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
- पपईचे जास्त सेवन केल्यास अतिसार होऊ शकतो, तसेच डिहायड्रेशनची समस्याही उद्भवू शकते.
- तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या असतील, तर तुम्ही जास्त प्रमाणात पपई खाणं टाळावं.