सोशल मीडियाच्या काळात लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी विविध मार्ग वापरत आहे. काहीजण स्वत:चे व्हिडिओ, फोटो सतत शेअर करत असतात. तर काहीजण मुलांना समोर ठेवून सोशल मीडियात प्रसिद्ध होऊ पाहतात. असे अनेक पालक आहेत ज्यांना त्यांच्या मुलांमुळे प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र असे करणे खरंच योग्य आहे का? तुम्हाला नाही वाटतं यामुळे मुलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. (Parenting advice)
काही पालक असे असतात की, जेव्हा बाळ जन्माला आले की लगेच सोशल मीडियात त्यांच्या नावे अकाउंट तयार करुन त्याचे फोटो शेअर करू लागतात. मात्र मुलांचे बालपणाचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियात टाकल्याने नक्की त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे पालकांना माहिती नसते. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यामध्ये लहान मुलांना समोर दाखवून पालकांनी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मुलांचे फोटो डार्क वेब किंवा चुकीच्या गोष्टींसाठी वापरले गेल्याच्या तक्रारी ही समोर आल्या.
खरंतर असे करणे सायबर गुन्हा आहेच. पण यामुळे तुमच्या मुलाचे भविष्य सुद्धा धोक्यात येऊ शकते हे पालकांना कळले पाहिजे. मुलांच्या प्रायव्हेसीची काळजी घेणे हे केवळ पालकांच्या हातात असते. त्याकडे पालकांनी प्रसिद्धी मिळावी म्हणून दुर्लक्ष करू नये. या व्यतिरिक्त याचा फटका मुलांना त्यांच्या भविष्यात ही होऊ शकतो याची खबरदारी पालकांनी घेतली पाहिजे.
हेही वाचा- मुलांचा मानसिक विकास आणि मातृभाषा