Monday, April 15, 2024
घरमानिनीRelationshipघरापासून दूर राहूनही अशी घ्या आई-वडिलांच्या हेल्थची काळजी

घरापासून दूर राहूनही अशी घ्या आई-वडिलांच्या हेल्थची काळजी

Subscribe

प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांची काळजी घेतात. त्यांना हवं नको ते सर्वकाही पुरवतात. मात्र जेव्हा त्यांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले जाते तेव्हा ते त्याकडे दुर्लक्ष करतात. आई आजारी पडली तर बाबा काळजी घेतात तर कधी बाबा-आईची. अशातच मुलं त्यांच्यापासून दूर राहत असेल तर अधिक पंचायत होते. (Parenting health care)

नोकरी असो किंवा शिक्षणासाठी घरापासून दूर राहत असालो तरीही आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी वाटत राहते. अशावेळी तुम्ही त्यांची कशी काळजी घ्याल याबद्दलच्या काही टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

- Advertisement -

-दररोज बातचीत करा


कामकाजामुळे वेळ मिळत नसल्याने आई-वडिलांशी दररोज बातचीत करता येत नाही. कधीकधी काही दिवसांच्या कालांतराने तरीही आपल्या आई-वडिलांना फोन करत जा. त्यावेळी त्यांच्या आरोग्याची विचारपूस जरुर करा. त्यांना हेल्दी लाइफस्टाइल जगण्यासाठी प्रोत्साहित करा.

- Advertisement -

-हेल्थ चेकअप


मुलांनी आपल्या आई-वडिलांना हेल्थ चेकअप बद्दल विचारले पाहिजे. प्रत्येक 3 महिन्यांनी एकदा तरी त्यांना हेल्थ चेकअपसाठी घेऊन जा. तु्म्हाला ते जमत नसेल तर नात्यातील एखाद्याला त्यांच्यासोबत जायला सांगा.

-नातेवाईकांच्या संपर्कात रहा


नोकरी किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेल्या मुलांनी आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात राहिले पाहिजे. त्यांच्याकडून तु्म्ही आई-वडिलांची विचारपूस करु शकता. शक्य असेल तर नातेवाईकांना काही दिवस त्यांच्यासोबत वेळ घालवण्यास ही सांगा.

-हेल्थ इंन्शुरन्स


नोकरपेशा मुलांनी आपल्या आई-वडिलांचा आरोग्याचा इंन्शुरन्स काढला पाहिजे. जेणेकरुन त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर तो कामी येईल. तसेच आई-वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांपासून हेल्थ संबंधित कोणतीच माहिती लपवू नये.


हेही वाचा-घरातील ज्येष्ठ नागरिक चिडचिड करताहेत, मग असं करा हँडल

- Advertisment -

Manini