Thursday, April 25, 2024
घरमानिनीRelationshipतुमचं मुल स्वभावाने बुजरे आहे का? मग त्याला असे बनवा confident

तुमचं मुल स्वभावाने बुजरे आहे का? मग त्याला असे बनवा confident

Subscribe

काही मुलं फार स्मार्ट असतात तर काही लाजाळू. तर काही मुलं ही बुजरे असतात. यासाठी नेहमीच मुलांचा स्वभावच नव्हे तर पालकांची सुद्धा चुक असू शकते. अशातच गरजेचे आहे की, काही गोष्टींची काळजी घेतला पाहिजे. जेणेकरुन तुमचे मुलं बोल्ड आणि आत्मविश्वासू बनेल. त्यासाठी पालकांनी पुढील काही टीप्स जरुर लक्षात ठेवल्या पाहिजेत.

मुलांसोबत प्रेमाने वागा

- Advertisement -


मुलांना आयुष्यात एक उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी काही वेळेस पालक त्याच्यासोबत कठोरपणे वागतात. असे केल्याने मुलं घाबरतात आणि त्यांना काही गोष्टी करण्यासाठी मोकळीकता मिळत नाही. अशातच ते नेहमी घाबरल्यासारखे राहिल्यास बुजऱ्या स्वभावाचे होऊ शकतात. यामुळेच गरजेचे आहे की, त्यांच्यासोबत प्रेमाने वागावे. जेणेकरुन त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढेल.

मुलांवर हात उचलू नका

- Advertisement -


मुलांनी एखादी चुक केली तर त्याच्यावर लगेच हात उचलण्याची चुक पालकांनी कधीच करु नये. यामुळे मुलांच्या मनात तुमच्याबद्दल नकारात्मकता अधिक वाढली जाईल. तसेच त्यांचा आत्मविश्वास ही कमी होऊ लागतो. त्याला प्रेमाने समजावून सांगितल्यास काही गोष्टी सुटतील.

मुलांची दुसऱ्यांसोबत तुलना करु नका


मुलांची तुलना कधीच दुसऱ्या मुलांसोबत करु नये. खरंतर काही पालक असे करतात. यामुळे मुलामध्ये तुमच्या बद्दलचा राग अधिक वाढतो. ऐवढेच नव्हे तर मुलाला आपल्यातच काहीतरी कमी आहे असे वाटत राहिल्याने तो ढब्बू स्वभावाचे होतात.

मुलांना प्रोत्साहित करत रहा


बहुतांश पालक मुलाने एखादे काम केल्यानंतर ही चुका काढतात. यामुळे मुलामधील आत्मविश्वास कमी होऊ लागतो आणि ते खुप शांत शांत राहू लागतात. अशातच मुलांनी तुम्हाला काहीतरी करुन दाखवल्यानंतर त्यांचे कौतुक जरुर करा.


हेही वाचा- Parenting Tips: तुमचे मुलं रात्रभर झोपत नसेल तर ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करु नका

- Advertisment -

Manini