Friday, April 19, 2024
घरमानिनीRelationshipमुलांना Mentally Strong बनवायचे असेल तर पालकांनी 'या' चुका करु नये

मुलांना Mentally Strong बनवायचे असेल तर पालकांनी ‘या’ चुका करु नये

Subscribe

मेंटली स्ट्रॉंन्ग असलेल्या मुलांना नवी आव्हाने स्विकारणे जडं जात नाही. ते कोणत्याही समस्येशिवाय नव्या वातावरणात मिक्स होतात. तसेच समस्यांचा सामना कसा करावा याचा प्रयत्न ही ते स्वत: करतात. परंतु आव्हान पुर्ण करण्यास ते अयशस्वी झाल्यास त्यांना सकारात्मक पद्धतीने कसे घ्यावे याबद्दल पालकांनी आपल्या मुलांना सांगावे. याउलट काही पालकांच्या चुकांमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर ही अज्ञातपणे परिणाम होतो. अशातच मुलांना मेंटली स्ट्राँन्ग बनवण्यासाठी पालकांनी पुढील काही चुका करणे टाळले पाहिजे. (Tips for mentally strong child)

-प्रत्येक गोष्टीवर मुलाला गप्प करणे
जर तुम्हाला मुलासोबत वाद घालायचा नसेल आणि प्रत्येक गोष्टीत मुलाला बोलण्याची संधी देत नसाल तर ही चुक पालकांनी कधीच करु नये. असे केल्याने मुलं हळूहळू आपल्या मनातील गोष्टी मनातच ठेवतात. यामुळे समस्या वाढू शकते. ते स्वत:ला अशा स्थितीपासून दूर ठेवू लागतात ज्यामुळे त्यांना त्रास होईळ. ऐवढेच नव्हे तर त्यांना आतमधल्या आतमध्ये एकटेपणा ही वाटू शकते.

- Advertisement -

-अयशस्वी होण्यापासून बचाव करणे
काही पालक आपल्या मुलाने जिंकावे म्हणून विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास लावतात. परंतु त्यात अपयश आल्यानंतर ओरडतात. असे ही अजिबात पालकांनी मुलांसोबत करु नये. जेव्हा ते हार पचवण्यास शिकतील तेव्हा त्यांना आपल्या समोर आलेल्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे कळेल. ते मानसिकरित्या अधिक स्ट्राँन्ग होऊ शकतात.

- Advertisement -

-संकटावेळी रडत बसणे
मुलांसाठी आपले आई-वडिल रोल मॉडल असतात. अशातच तुम्ही मुलांसमोर सुद्धा वारंवार नकारात्मक गोष्टी बोलत असाल किंवा निराश राहत असाल तर ते मानसिकरित्या वीक होऊ शकते. अशी चुक पालकांनी कधीच करु नये.

-भीतापासून दूर पळणे
जर पालक चुका झाल्यानंतर मुलाला ते काम करु नको असे सांगत असेल तर थांबा. त्यांना भीतीपोटी काम थांबवण्यास सांगणे चुकीचे आहे. याउलट भीती वाटल्यानंतर ही त्याला काही गोष्टी करण्यास सांगितल्यानंतर तो मानसिकरित्या स्ट्राँन्ग होऊ शकतो हे सुद्धा पालकांनी लक्षात घ्या. (Tips for mentally strong child)

-चुका करण्यापासून अडवणे
असे म्हटले जाते की, चुकांमधूच प्रत्येकजण शिकतो. अशातच तुमची मुलं सुद्धा चुका करत असतील तर त्यांना समजावून सांगा. चुका करणे काही चुकीचे नाही. पण एकच चुक वारंवार करत असेल तर पालकांनी त्याच्याकडे अधिक लक्ष द्या.


हेही वाचा- मुलांना Mentally Strong बनवायचे असेल तर पालकांनी ‘या’ चुका करु नका

- Advertisment -

Manini