सध्याच्या जगात मुलांचे संगोपन करणे हे एक मोठं आव्हान बनलं आहे. प्रत्येक मुलाची आवडनिवड ही वेगवेगळी असते. यामुळेच प्रत्येक प्रकारची पॅरेंटिंग स्टाईल प्रत्येक मुलासाठी फिट असेलच असं नाही. आजपर्यंत तुम्ही अनेक पॅरेंटिंग स्टाईलविषयी ऐकलं असेल परंतु तुम्हाला माहित आहे का की प्लास्टिक रॅप पॅरेंटिंग काय असतं ? अनेक पालक आपल्या मुलांसाठी प्लास्टिक रॅप पॅरेंटिंग फॉलो करतात पण तुम्हाला ठाऊक आहे का या पॅरेंटिंग प्रकाराच्या फायदे आणि नुकसानांविषयी.
काय आहे प्लास्टिक रॅप पॅरेंटिंग ?
प्लास्टिक रॅप पॅरेंटिंग मुलांच्या संगोपनाचा एक असा प्रकार आहे. ज्यात आईवडील प्रत्येक संभाव्य धोक्यापासून मुलांना वाचवण्यासाठी एक संरक्षित वातावरण तयार करतात. याप्रकारच्या पॅरेंटिंगमध्ये मुलांच्या सुरक्षेला एका अशा चादरीमध्ये किंवा बुडबुड्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यात त्यांना कोणत्याच समस्येचा सामना करावा लागत नाही.
याला प्लास्टिक रॅप पॅरेंटिंग का म्हणतात ?
पॅरेंटिंगच्या हा प्रकार म्हणजे जणू काही मुलांना प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळण्यासारखाच आहे. म्हणूनच याला प्लास्टिक रॅप पॅरेंटिंग असं म्हटलं जातं. हे आपण एका उदाहरणातून समजून घेऊयात, जसं प्लास्टिक रॅपर कोणतीही गोष्ट पूर्णपणे झाकून घेतं. अगदी त्याचप्रमाणे या प्रकारच्या पालनपोषणामध्ये मुलांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. फरक फक्त इतकाच की यामध्ये प्रेम आणि सुरक्षा असते.
प्लास्टिक रॅप पॅरेंटिंगचे संकेत :
प्रत्येक संभाव्य धोक्यापासून मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करणे.
मुलांना स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ न देणे.
मुलांना चुका करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करणे.
मुलांना स्वातंत्र्य देण्यापासून घाबरणे.
प्लास्टिक रॅप पॅरेंटिंग नुकसानदायक का आहे ?
आत्मविश्वासामध्ये कमतरता :
याप्रकारच्या पॅरेंटिंगमध्ये आईवडील मुलांची खूप काळजी करतात. अशा पॅरेंटिंग प्रकारात मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता पाहायला मिळते. कारण ते नवा अनुभव घेण्यापासून घाबरत असतात. यासाठीच मुलांना आयुष्यात पुढे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
स्वातंत्र्याचे नुकसान :
या प्रकारच्या संगोपनामध्ये प्रेमाच्या नावाखाली मुलांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. आणि त्यांना स्वातंत्र्यापासून दूर ठेवले जाते. त्यांना त्यांचे निर्णय घेण्याची आणि त्यांच्या चुकांपासून शिकण्याची संधी मिळत नाही.
सामाजिक कौशल्यांमध्ये कमतरता :
प्लास्टिक रॅप पॅरेंटिंगने झालेल्या संगोपनातून मोठी झालेल्या मुलांना एकमेकांसोबत बोलण्याची आणि नाते तयार करण्याची संधी कमी मिळते. त्यांच्या सामाजिक कौशल्यांचा विकास होऊ शकत नाही.
ताणतणावाचे कारण :
प्लास्टिक रॅप पॅरेंटिंगने मुलांचं संगोपन करत असताना आईवडील नेहमीच चिंतेत किंवा समस्येमध्ये असतात. ते लहानसहान गोष्टींसाठीही भरपूर विचार करत राहतात. अशात त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावरही होतो आणि ते ताणतणावाची शिकार होतात.
नव्या अनुभवांना घाबरणे :
मुलांच्या संगोपनासाठी जेव्हा आईवडील प्लास्टिक रॅप पॅरेंटिंगचा मार्ग निवडतात तेव्हा मुलांना नवे अनुभव घेण्याची आणि आपली कलात्मकता दाखवण्याची संधी मिळत नाही.
अनहेल्दी कॉम्पिटिशन :
प्लास्टिक रॅप पॅरेंटिंग मुलांना अशा एका कॉम्पिटिशनचा हिस्सा बनवतं जे त्यांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारे त्रासदायक ठरू शकतं. कारण अशा पालकांच्या मुलांकडून फार अपेक्षा असतात आणि ते त्यांच्या मुलांना इतरांपेक्षा अधिक चांगलं बनवण्यासाठी खूप दबाव टाकतात.
हेही वाचा : Diabetes Symptoms : पायांवरील ही लक्षणे देतात डायबिटीसचे संकेत
Edited By – Tanvi Gundaye