प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की त्यांची मुळं यशस्वी व्हावीत, यासाठी ते प्रत्येक प्रकारचे प्रयत्न करत असतात. आईवडिलांनी मुलांसाठी तयार केलेले नियम आणि मार्गदर्शन यांच्यामुळे मुलांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी मदत होते. मुलांच्या आयुष्यात आई आणि वडील या दोघांचीही भूमिका वेगवेगळी असते.
जिथे आई प्रेमळपणाने लाड करते तिथे वडील कडक वागून मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतात. या लेखातून जाणून घेऊयात आईवडिलांच्या कोणत्या नियमांमुळे मुलांना यश मिळू शकते. थोडक्यात नेमके कोणते नियम मुलांसाठी तयार करायला हवेत.
सगळ्यांचा सन्मान करणे :
जर वडील नोकरी करणारे असतील तर अनेकदा कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना मुलांसोबत वेळ घालवणं जमत नाही. अशात आईवर आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याची वेळ येते. आईने आपल्या मुलांसाठी नियम तयार करायला हवा की मुलांनी वडिलधाऱ्यांचा मान राखावा आणि त्यांचा आदर व सन्मान करावा. यामुळे नाती मजबूत होतात आणि दुसऱ्यांप्रति सहानुभूतीची भावना निर्माण होते.
मेहनत महत्त्वाची आहे :
तुम्ही मुलांना हेही सांगायला हवं की परिणामांपेक्षा तुम्ही किती मेहनत घेता तीदेखील महत्त्वाची आहे. यामुळे मुलांमध्ये ग्रोथ माइंडसेट विकसित होईल. याव्यतिरिक्त मुलांना आव्हांनाचा स्वीकार करणं आणि आपल्या चुका सुधारणं यांची जाणीव होईल. ते चुकांमधून शिकू लागतील.
जबाबदारी घेणं :
आईने आपल्या मुलांना शिकवायला हवं की जर मुलांची काही चूक असेल तर मुलांनी स्वत:हून त्याची जबाबदारी घ्यायला हवी. यामुळे मुलं कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार करतील. आणि योग्य विचार करुन निर्णय घेतील. अशाप्रकारे तुम्ही मुलांना त्यांच्या कामासाठी जबाबदार आणि जागरुक बनवू शकता.
पैशांची माहिती :
मुलांना कमी वयातच बचतीचं महत्त्व शिकवायला हवं. त्यांना सांगायला हवं की कशाप्रकारे मर्यादित प्रमाणात खर्च करता येऊ शकतो. आणि आपल्या खर्चामध्ये व बचतीमध्ये कसं संतुलन राखणं गरजेचं आहे. यामुळे मुलांना पैसे वापरण्याची शिस्त लागेल आणि ते पैशांच्या बाबतीत योग्य निर्णयही घेऊ शकतील. मुलांना पैशांची बचत करायला शिकवणे अत्यंत गरजेचे आहे.
सुरक्षित सीमा तयार करणं :
मुलांना शिकवायला हवं की त्यांनी प्रत्येक नात्यामध्ये एक सुरक्षित सीमा आखायला हवी. त्यांनी इतरांच्या पर्सनल स्पेसचा सन्मान करायला हवा आणि इतरांच्या निवडीला कधीच हसू नये किंवा कमी दर्जाचे समजू नये. यामुळे मुलांचे इतरांसोबतचे नाते मजबूत बनेल आणि लोकही मुलांना प्रेमाने व सन्मानाने वागवतील.
हेही वाचा : Relationship Tips : नात्यामध्ये कधीकधी ‘इगो’ असतो फायदेशीर
Edited By – Tanvi Gundaye