पेरेंटिंग अर्थात पालकत्व हा एक आनंददायी अनुभव असतो आणि त्याचबरोबर तो आव्हानात्मक देखील असतो. मुलांची काळजी घेणे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यांना योग्य ती दिशा दाखवणे या जबाबदारी अनेकदा पालकांसाठी ताण निर्माण करू शकते. काही सोप्या पद्धतींनी पेरेंटिंगचा हा ताण कमी करता येऊ शकतो. पालकत्वाचा ताण कमी करण्यासाठी काही प्रभावी पेरेटिंग टिप्स कोणत्या ते आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.
वास्तववादी अपेक्षा ठेवा:
बऱ्याचदा पालक स्वतःवर खूप दबाव आणतात की त्यांना त्यांच्या मुलासाठी सर्व काही परफेक्ट करावे लागते. तसेच, त्यांना त्यांच्या मुलांकडून खूप जास्त अपेक्षा असतात, ज्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. यासाठी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक मूल वेगळे असते आणि त्याची स्वतःची गती आणि क्षमता असते. मुलांना त्यांच्या आवडी आणि क्षमतेनुसार पुढे जाऊ द्यावे. वास्तववादी आणि साध्य करता येण्याजोगी ध्येये ठेवल्याने तुमचा आणि तुमच्या मुलांचा ताण कमी होईल.
वेळेच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा:
पेरेंटिंगसोबत काम, घर आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधणे कठीण होऊ शकते. यासाठी एक दिनचर्या बनवा आणि तुमचा वेळ योग्यरित्या व्यवस्थापित करा. मुलांसोबत क्वालिटी वेळ घालवण्यासाठी नियमितपणे वेळ काढा. यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि मुलांनाही तुमचा आधार वाटेल.
स्वतःची काळजी घ्या:
पालक म्हणून आपण अनेकदा आपल्या स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतो, परंतु तुम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. नियमित व्यायाम, निरोगी आहार आणि पुरेशी झोप यामुळे तुमचा ताण कमी होण्यास मदत होईल. जेव्हा तुम्ही आनंदी आणि निरोगी असाल, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांची काळजी चांगल्याप्रकारे घेऊ शकाल.
मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका :
पेरेंटिंग हे एक टीम वर्क आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे सर्वकाही हाताळू शकत नाही, तर कुटुंब किंवा मित्रांकडून मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. कधीकधी मुलांच्या संगोपनासाठी तज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. मदत घेतल्याने तुमचा भार कमी होईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे पेरेंटिंग करू शकाल.
मुलांशी बोलत राहा :
मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणे महत्वाचे आहे. त्यांच्या भावना आणि विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा मुले स्वतःला व्यक्त करू शकतील तेव्हा त्यांचे वर्तन सुधारेल आणि तुमचा ताणही कमी होईल. संभाषणामुळे नाते मजबूत होते आणि पालकत्व सोपे होते.
स्वतःसाठी वेळ काढा :
पालकत्वाच्या काळात स्वतःसाठी वेळ काढणे महत्वाचे आहे. तुमच्या आवडत्या कामांमध्ये सहभागी होऊन किंवा एकटे वेळ घालवून तुम्ही तुमचे मन शांत करू शकता. हे तुम्हाला तणावमुक्त आणि उत्साही ठेवेल.
चुकांमधून शिका :
पालकत्वात चुका होणे स्वाभाविक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी स्वत:ला दोषी वाटून घेण्याऐवजी, चुकांमधून शिका आणि पुढे जा. तुम्ही सर्वकाही बरोबर कराल असा विचार केल्याने ताण वाढेल. मुलांशी संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.
ध्यान आणि योगाची मदत घ्या :
ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि योग खूप फायदेशीर ठरू शकतात. दररोज काही मिनिटे ध्यान केल्याने मन शांत होते आणि ताण कमी होतो. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवा :
पालकत्वादरम्यान नकारात्मक विचार मनात येणे स्वाभाविक आहे, परंतु सकारात्मक दृष्टिकोन राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांसोबत घालवलेल्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या आणि त्यांच्या यशाचा अभिमान बाळगा. सकारात्मक विचारसरणी तुमचा ताण कमी करेल आणि पालकत्व अधिक आनंददायी बनवेल.
हेही वाचा : Health Tips : सायकलिंग करण्याचे आरोग्यदायी फायदे
Edited By – Tanvi Gundaye