Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship Hyper Active मुलाला असं करा हँन्डल

Hyper Active मुलाला असं करा हँन्डल

Subscribe

काही मुलं नॉर्मन मुलांसह वेगळी असतात आणि त्यांच्या अॅक्टिव्हिटी सुद्धा वेगळ्या असतात. कारण अशी मुलं अटेंशन डेफिसिटी हाइपर अॅक्टिव्हिटी डिसऑर्डर मधून जात असतात. अशा मुलांना कशा प्रकारे हँन्डल करावे याची माहिती डॉक्टर व्यवस्थितीत देऊ शकतात. त्यामुळे हायपर अॅक्टिव्ह मुलाला नक्की कसे हँन्डल करावे याच बद्दल अधिक जाणून घेऊयात. (hyper active child)

- Advertisement -

सर्वात प्रथम अटेंशन डेफिसिटी हाइपर अॅक्टिव्हिटी म्हणजेच लक्ष केंद्रित करण्याची कमतरता. ज्यामध्ये मुलं शांतपणे कोणत्याही गोष्टीवर लक्ष देऊ शकत नाही. अधिक बोलतो किंवा सतत बोलत राहतो. त्याचसोबत मुलं लगेच स्वत:मध्ये गुंतात. यासाठी तज्ञांचा सल्ला घेण्यास सांगितले जाते किंवा मुलावर उपचार केले जातात. मात्र डॉक्टरांच्या गाइडलाइन्सचे पालन करणे गरजेचे असते.

पॅरेंट्स मुलांसाठी नेहमीच संवेदनशील असतात. त्याचसोबत हायपर अॅक्टिव मुलाला शांत ठेवण्यासाठी घरातील वातावरण उत्तम आणि शांत असावे. या व्यतिरिक्त घरी काही नियम तयार करू शकता. जर तुम्ही मुलावर वेळोवेळी लक्ष ठेवून असाल तर तो अधिक हायपर अॅक्टिव्ह होऊ शकतो.

- Advertisement -

हायपर अॅक्टिव्ह मुलं खुप वेळ शांत बसू शकत नाहीत. अशातच बेस्ट पर्याय की, तुम्ही त्याच्या काही गोष्टींची लिस्ट तयार करा. त्या गोष्टी काही हिस्स्यांमध्ये विभागा. जेणेकरुन मुलं ती गोष्ट पूर्ण करु शकतो. या व्यतिरिक्त त्यांच्याशी प्रेमाने वागा. जेव्हा तुम्ही मुलासाठी पूर्ण वेळ काढत असाल तर त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला त्याच्या कामासाठी तुम्ही रिवॉर्ड देऊ शकता.


हेही वाचा- दहा वर्षांनंतर तू कुठे असशील?

- Advertisment -

Manini