Sunday, October 1, 2023
घर मानिनी Relationship पालकांनो तुमच्या 'या' चुकांमुळे मुलं करतील तिरस्कार

पालकांनो तुमच्या ‘या’ चुकांमुळे मुलं करतील तिरस्कार

Subscribe

मुलं ही मनाने हळवी असतात. अशातच पालक जेव्हा कधी त्यांना ओरडतात तेव्हा त्यांना फार वाईट वाटते. काही वेळेस काही कारणांस्तव मुलंच आपल्या पालकांचा तिरस्कार करु लागतात. यामागील सर्वाधिक मोठे कारण असे की, मुलांचे ऐकून न घेणे. जेव्हा तुमचे मुलं एखाद्या कारणामुळे तुमच्याकडे येते, एखादी समस्या सांगते तेव्हा लगेच त्याला त्यावर उत्तर देण्याआधी त्याचे व्यवस्थितीत ऐकून घ्या. सर्वात प्रथम तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, तुम्ही जेवढे शांत रहाल तेवढाच मुलाला बोलण्याची संधी मिळेल. अशातच मुलं नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हे तुम्हाला कळेल. परंतु पालाकांनी अशा काही चुका करु नयेत ज्यामुळे मुलं तुमचा तिरस्कार करतील. (Parenting tips)

दुसऱ्या मुलांची अधिक व्वा व्हा करु नका
ही फार सेंसिटिव्ह स्थिती असून यावेळी फार सावधगिरी बाळगावी. दुसऱ्या मुलांच्या समोर आपल्या मुलाचा कधीच खालीपणा करु नये. यामुळे मुलं तुमचा राग करतीलच पण ते तुमच्यापासून दुरावले ही जातील.

- Advertisement -

विनाकारण शिक्षा देणे
पालकांवर फार जबाबदाऱ्या असतात. कधीकधी खुपच व्यस्त असाल्याने कळत नाही की, आपली मुलं नक्की काय करत आहेत. जेव्हा ते एखादी तक्रार घेऊन येतात तेव्हा त्याच्यावर रागवत विनाकारण शिक्षा देऊ नका. कोणताही विचार न करता शिक्षा देणे चुकीचे आहे. आपल्याला वाटते की, मुलांसोबत योग्यच केले आहे. अज्ञातपणे शिक्षा देणे फार नुकसानकार ठरु शकते.

- Advertisement -

कठोरपणे वागणे
मुलांना नवीन गोष्टी शिकण्यास फार आवडतात. अशातच जेव्हा तुम्ही त्यांना ते करणे अडवतात किंवा त्यांच्याशी कठोरपणे वागात तेव्हा ते मुलांना फार वाईट वाटू शकते. आपल्या मुलांसोबत कठोरपणे वागणे किंवा त्याला टोकण्याऐवजी त्यालाा समजून घेतले पाहिजे. (Parenting tips)

आपला राग मुलांवर काढणे
पालक कधीकधी आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवू शकत नाहीत. जेव्हा ते इमोशनली पूर्णपणे थकतात तेव्हा ते आपला राग आणि फ्रस्ट्रेशन काढतात. जेव्हा हे मुलं नोटिस करतात तेव्हा ते आपल्या पालकांना नापसंद करु लागतात.


हेही वाचा- मुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे Physical Activity

- Advertisment -

Manini