बदलत्या काळानुसार पालकत्वाची शैलीही बदलू लागली आहे. लोकही त्यांच्या सोयीनुसार आणि विचारसरणीनुसार पालकत्वाचा प्रकार निवडू लागले आहेत. जेंटल पेरेंटिंग, सबमिसिव पेरेंटिंग, ऑथोरोटेटिव पेरेंटिंग अशा अनेक प्रकारच्या पेरेंटिंगचे प्रकार सध्या या दिवसात दिसू लागले आहेत. परंतु फारच कमी लोकांना पालकत्वाचा एक नवा प्रकार माहित असेल आणि तो म्हणजे हॉरिझोन्टल पॅरेंटिंग. दिवसभराच्या गजबजाटानंतर आणि कामाच्या दडपणानंतर, प्रत्येकाला अनेकदा विश्रांती घ्यावीशी वाटते, परंतु घरात लहान मुले असताना हे करणं खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत, हॉरिझोन्टल पॅरेंटिंग खूप प्रभावी ठरू शकते. हॉरिझोन्टल पॅरेंटिंग म्हणजे काय आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत हे आज जाणून घेऊयात.
हॉरिझोन्टल पॅरेंटिंग म्हणजे काय ?
या प्रकारच्या पेरेंटिंगमध्ये, तुम्ही झोपता झोपता मुलाची काळजी घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला आवश्यक ती विश्रांतीही मिळते आणि तुमचे मूल सुरक्षितही राहते. जर तुमचे मूल विश्रांती आणि झोप टाळत असेल, तर त्यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्याशी तडजोड करण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्हाला झोप येत नसेल, तर तुम्ही किमान गादीवर पडून दीर्घ श्वास घेत स्वत:ला रिलॅक्स करू शकता. मानसिकदृष्ट्या खचलेल्या पालकांसाठी हॉरिझोन्टल पेरेटिंग हे एकप्रकारचे वरदानच आहे. थोडक्यात काय तर आपण विश्रांती घेत असताना मुलांना खेळात व्यस्त ठेवणे आणि त्यांची त्याच परिस्थितीत काळजी घेणे यालाच हॉरिझोन्टल पॅरेंटिंग म्हणतात.

हॉरीझोन्टल पेरेटिंगचे फायदे जाणून घेऊयात :
एनर्जी कन्झर्व्हेशन – याद्वारे, खूप थकलेले पालक त्यांची ऊर्जा वाचवू शकतात आणि थकवा दूर करू शकतात.
क्रिएटिव्ह एंगेजमेंट – झोपताना गेम खेळण्याचे अनेक सर्जनशील मार्ग आहेत, ज्यामुळे पालकांचा थकवा दूर तर होतोच पण मुलाच्या बौद्धिक विकासातही मदत होते.
शारीरिकदृष्ट्या समान पातळीवर येणे – जेव्हा मुलांसोबत तुम्ही झोपून खेळता तेव्हा तुम्ही त्यांना क्रिएटिव्ह पद्धतीने व्यस्त ठेवत असता. या अशा प्रकारच्या खेळांमुळे पालक आणि मुलांमधील बाँडिंग सुधारते.
हॉरिझोन्टल पेरेंटिंगसाठी काही क्रिएटिव्ह टिप्स :
रोड मॅप टी-शर्ट : टी-शर्टच्या मागील बाजूस रस्ता नकाशा काढा किंवा रस्ता ट्रॅक काढा जिथे मुले त्यांच्या छोट्या छोट्या कार चालवू शकतील. याच्या मदतीने तुम्ही पोटावर झोपून तुमच्या शरीराला आराम देऊ शकाल, तुमच्या पाठीमागे असलेली मुलं गाडी चालवत असतील तर तुमच्याही पाठीचाही मसाज होऊ शकेल आणि मुलांनाही एक नवा खेळ खेळता येईल. रोड मॅप ऐवजी, तुम्ही टिक टॅक टो गेम देखील बनवू शकता.
स्टोरीटाइम : झोपण्याच्या वेळेस तुम्ही तुमच्या मुलांसमवेत पुस्तकं वाचू शकता आणि त्यांना बेडटाईम स्टोरीजही सांगू शकता. यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेचाही विकास होईल आणि त्याच वेळी एकत्र झोपल्याने मुलांमध्ये तुमच्याविषयी जिव्हाळाही निर्माण होऊ शकेल.
सॉफ्ट टॉयज थ्रो : झोपल्यावर मऊ खेळणी किंवा उशा मुलांच्या दिशेने फेका आणि मुलाला उचलायला सांगा. यामुळे, मूल उडी मारून तुमच्यासमोर खेळू शकेल आणि तासन्तास अशा खेळांमध्ये व्यस्त राहील.
Edited By – Tanvi Gundaye