Friday, December 13, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीRelationshipParenting Tips : मुलांच्या संगोपनाच्या प्रेशरमुळे होऊ शकते पॅरेंटल बर्नआऊट

Parenting Tips : मुलांच्या संगोपनाच्या प्रेशरमुळे होऊ शकते पॅरेंटल बर्नआऊट

Subscribe

आईवडील होणे हे जितके आनंददायी असते, तितकेच कठीणही असते. आपल्या मुलांच्या आनंदासाठी आणि सुरक्षेसाठी नेहमी काम करत राहणं, त्यांची देखभाल करणं आणि आणखी न जाणो किती जबाबदाऱ्या आईवडिलांच्या खांद्यावर असतात. अशात पालक कधीकधी बर्नआऊटची शिकार होऊ शकतात. ज्याला पेरेंटल बर्नआऊट असं म्हटलं. आज आपण त्याच स्थितीविषयी जाणून घेणार आहोत आणि यापासून कशी सुटका करुन घ्यायची याबद्दलदेखील.

काय आहे पॅरेंटल बर्नआऊट ?

पॅरेंटल बर्नआऊट ही एक अशी स्थिती आहे, ज्यात आईवडीलांना खूप तणावाला आणि थकव्याला सामोरे जावे लागते. या स्थितीमध्ये आईवडिलांना असं वाटत असतं की मुलांची देखभाल करण्यात आपण कमी पडतोय. आणि मुलांसोबत ते एक भावनिक बंध तयार करू शकत नाहीत. ही एक अशी स्थिती आहे जी आईवडील अशा दोघांवरही एक खोल परिणाम करू शकते.

- Advertisement -

पॅरेंटल बर्नआऊटची कारणे काय आहेत ?

जबाबदारी – मुलांच्या देखभालीसोबतच घराची आणि ऑफिसची इतर कामांचीही जबाबदारी घेऊन आईवडील खूप थकून जातात.

झोपेची कमतरता – मुलांच्या देखभालीमुळे आईवडीलांना पूर्ण झोप मिळत नाही. ज्यामुळे त्यांना थकव जाणवतो.

- Advertisement -

सोशल सपोर्ट मिळत नाही – कुटुंब आणि मित्रांचा सपोर्ट न मिळाल्यामुळे सोशल आईवडिलांना एकटं एकटं वाटू लागतं.

वाढत्या अपेक्षा – आपल्या मुलांकडून जास्त अपेक्षा ठेवल्याने आईवडील ताणतणावाची शिकार होतात

आर्थिक तणाव – पैशांची समस्या असल्यामुळेही आईवडिलांना ताणतणावाला सामोरे जावे लागतात.

Parenting Tips: The pressure of raising children can cause parental burnout

पॅरेंटल बर्नआऊटची लक्षणे काय असतात ?

पॅरेंटल बर्नआऊटची अनेक लक्षणे असतात. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे –

थकवा आणि कमजोरपणा – सतत थकवा जाणवणं आणि लहानसहान कामं करणंही मुश्किलीचं होऊन जातं.

चिडचिड – मुलं आणि कुटुंबातील सदस्यांवर लगेच राग येणे.

एकटेपण – इतरांपासून वेगळं आणि एकटं पडणं.

उदासीनता – प्रत्येक गोष्टीतला रस हरवणं.

शारीरिक समस्या – डोकेदुखी, पोटदुखी, झोप न येणे इत्यादी.

स्वत:ला दोषी समजणे – मुलांची देखभाल योग्यरितीने न केल्याने स्वत:ला दोषी समजणे.

पॅरेंटल बर्नआऊटपासून कसे वाचाल ?

पॅरेंटल बर्नआऊटपासून वाचवण्यासाठी तुम्ही खालील काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.

आराम करा – पुरेशी झोप घ्या आणि काही वेळाकरता आराम करा.

मदत घ्या – कुटुंबियांची आणि मित्रांची मदत घ्या.

स्वत:साठी वेळ काढा – दर दिवशी काही वेळ स्वत:साठी काढा आणि आपल्या आवडीच्या गोष्टी करण्याला प्राधान्य देतात.

योगा आणि मेडिटेशन करा – योगा आणि ध्यानधारणा केल्याने तणाव कमी होतो.

हेल्दी डायट घ्या – हेल्दी डायट खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि शरीराला एनर्जी मिळते.

रोज व्यायाम करा – व्यायाम केल्याने तणाव कमी होतो आणि झोप चांगली लागते.

हेही वाचा : Winter health : थंडीत दही खावं की नाही ?


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini