प्रत्येक पालक आपल्या मुलाचे भविष्य चांगले आणि आनंदी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. वर्तमानात केलेले संगोपन मुलांचे भविष्य ठरवत असते. यामुळेच मुलाच्या सर्वांगीण विकासात पालकांचा सर्वाधिक वाटा असतो. मुले देखील त्यांच्या पालकांना सर्वात जास्त पाहतात आणि ऐकतात. बऱ्याचदा ते त्यांच्या पालकांची कॉपी करत असतात. त्यामुळे मुलाला शिस्त शिकवण्यापूर्वी पालकांनी स्वतः शिस्त शिकणे आवश्यक आहे. तरीही, काही पालकांच्या अशा सवयी असतात ज्या नकळतपणे मुलांना लागतात आणि त्यांची मुले आळशी होऊ शकतात. यासाठीच आज जाणून घेऊया पालकांच्या कोणत्या सवयी मुलांना आळशी बनवू शकतात याविषयी.
मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांना फोन देणे :
जेव्हा पालक आपल्या मुलांच्या मस्तीला आणि खोडकरपणाला कंटाळलेले असतात किंवा त्यांना काही काम करायचे असते तेव्हा ते मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी, त्यांचं मन गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे फोन देतात. यामुळे मुले शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहत नाहीत आणि आळशी होतात. त्यामुळे पालकांच्या या चुकीमुळे मुले आणखीच आळशी होतात.
मुलांची सर्व कामे करणे :
जेव्हा पालक मुलांची सर्व कामे करण्यात अतिरिक्त मदत करतात. मूल काहीही करू शकण्याआधीच त्याची सर्व कामे आईवडीलच करून टाकतात. त्यामुळे मुलं प्रत्येक कामासाठी आई-वडिलांवर अवलंबून राहू लागतात आणि स्वत: कष्ट करण्याची गरजच मानत नाहीत. पालकांच्या या सवयी मुलांना आळशी आणि परावलंबी बनवू शकतात.
मुलांना नावं ठेवणे :
मुलाला आळशी किंवा निरुपयोगी अशी नावे देऊन ते आळशी असल्याची प्रतिमा त्यांच्या मनात निर्माण करतात आणि मग इच्छा नसतानाही मुलं अशी वागू लागतात. म्हणून, मुलांना नेहमी प्रेरणादायक शब्दांनी संबोधित करा.
स्वत: आळशी असणे :
मुले पालकांची कॉपी करतात. अशा परिस्थितीत पालकांनी वर्कआऊट केलं तर मुलंही त्यांच्या वर्कआउटची कॉपी करू लागतात. त्याच वेळी, जर पालक स्वत: आळशी असतील आणि दिवसभर बसून, मोबाईल आणि टीव्हीसमोर वेळ वाया घालवत असतील, कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचालींमध्ये गुंतलेले नसतील, तर अशा पालकांची मुले देखील त्यांच्यासारखीच आळशी होतात.
हेही वाचा : Chiki Chiki Boo Boom Boom : ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर भेटीला
Edited By – Tanvi Gundaye