असं म्हटलं जातं की लहान मुले मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. लहानपणीच त्यांच्यावर करण्यात आलेले संस्कार त्यांना आयुष्यभर साथ देतात. मुलांना वळण लावण्याचं, त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम हे आईवडिलांपेक्षा चांगलं कोणीही करू शकत नाही. कारण आईवडिलच मुलांच्या भविष्यासाठी झटत असतात. त्यांना चांगल्या सवयी लावतात. पालकांनी मुलांना चांगल्या सवयी लावण्याकरता दररोज सकाळी त्यांच्याशी काही अशा गोष्टींबद्दल बोलायला हवं ज्या त्यांना एक चांगला माणूस घडवू शकतील.
आज आपण जाणून घेऊयात काही अशा गोष्टींविषयी ज्या लहान मुलांना जरूर शिकवायलाच हव्यात. या केवळ लहान मुलांची जीवनशैलीच सुधारणार नाहीत.
नमस्कार, सुप्रभात किंवा गुड मॉर्निंग बोलायला शिकवा :
आईवडिलांनी सकाळी उठल्यावर लहान मुलांना सुप्रभात बोला. त्यांना हेही समजावून सांगा की जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटता तेव्हा त्यांना जरूर अभिवादन करा. हे आदर आणि सकारात्मकतेचे प्रतीक समजले जाते.
प्रत्येक ठिकाणी सॉरी करू शकेल काम :
जेव्हा मुलं कोणतीही चूक करतात तेव्हा त्यांना सॉरी बोलणं अवश्य शिकवा. जेव्हा तुमच्याकडून देखील कोणतीही चूक होते तेव्हा मुलांना नक्की सॉरी म्हणा. मुलं आईवडिलांना सॉरी म्हणताना जेव्हा पाहतात तेव्हा तेदेखील याला अधिक गंभीरपणे घेतात. हे शब्द त्यांच्या मनात घर करून बसतील.
थँक्यू बोलण्याची सवय लावा :
आईवडिलांनी आपल्या मुलांना प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींकरता थँक्यू म्हणणे शिकवायला हवं. जर तुमची मुलं थँक्यू बोलायला शिकली तर त्यांना हे आयुष्यभरासाठी फायदेशीर ठरू शकेल. ते सहजरित्या आभार व्यक्त करू शकतील.
मदत करण्याची भावना जागृत ठेवा :
मुलांमध्ये लहानपणापासूनच एकमेकांना मदत करण्याची भावना विकसित करायला हवी. जर ते दुसऱ्यांची मदत करत असतील तर त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा इतर लोकही त्यांच्या मदतीसाठी धावून येतील. मदत करणं ही एक चांगली सवय आहे.
प्लीज म्हणायला विसरू नका :
प्लीज हा असा शब्द आहे जो लहान मुलांमध्ये विनम्रतेचा भाव जागृत करतो. जेव्हा तुम्ही इतरांना प्लीज बोलू लागाल तेव्हा तुमच्याकडे पाहून ते स्वत: आपोआप शिकू लागतील. प्रेमाने म्हटलेलं प्लीज आपलं प्रत्येक काम खूप सोपं करू शकेल.
तुम्ही कसे आहात ?
जेव्हा आईवडील मुलांना हा प्रश्न विचारतात तेव्हा मुलांनादेखील ही सवय लागते. मुलांनाही वाटेल की इतरांची पर्वा करणे गरजेचे आहे. हे शब्द आईवडील आणि मुलांमधील नाते अधिक मजबूत करतात.
वरील सर्व शब्द लहान मुलांना शिकवल्यास मुलं अधिक संस्कारक्षम होतील. त्यांच्यात विनम्रता आणि आत्मविश्वास जागृत होऊ शकेल. व ते मोठ्यांचा आदर करणेही शिकतील.
हेही वाचा : Health Tips : फोनच्या अतिवापरामुळे कमी होऊ शकते पचनशक्ती
Edited By – Tanvi Gundaye