Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Relationship Parenting: 1-3 वर्षाच्या मुलांना अशी शिकवा शिस्त

Parenting: 1-3 वर्षाच्या मुलांना अशी शिकवा शिस्त

Subscribe

लहान मुलं ही अगदी निरासग असतात. त्यांना आपण काय करतोय, काय बोलतोय हे कळतं नसतं. ते आपल्याला जमेल त्या पद्धतीने पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी त्यांच्या इशाऱ्यातून ही काही गोष्टी ते सांगतात. लहान मुलं फार हट्टी असल्याने त्यांना हँन्डल कसे करावे हे काही पालकांना कळत नाही. अशातच जर तुम्ही वेळच्या वेळी मुलांना योग्य ते वळण लावल्यास ते काही वाईट गोष्टी करण्यापासून दूर राहतील.

मुलांचे कौतुक करण्यास विसरु नका
जेव्हा तुमचे मुलं एखादं चांगल काम करतो तेव्हा पालकांनी नेहमीच त्याचे कौतुक केले पाहिजे. यामुळे मुलाला चांगली सवय लावण्यासह त्याचा आत्मसन्मान ही सुधारेल. मुलाने चांगले काम केल्यानंतर त्याला कॉफी, चॉकलेटस देण्याऐवजी त्याला आनंदित करण्याचा प्रयत्न करा.

- Advertisement -

रुटीन सेट करा
मुलांना कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये ट्रॅक करण्यासाठी तु्म्ही दररोजचे त्यांचे एक रुटीन तयार करा. यामुळे तुम्हाला आणि मुलाला सुद्धा आपण काय करतोय हे कळेल. काही गोष्टीने शिस्तीने कशा करायच्या हे सुद्धा पालकांनी समजावून सांगितले पाहिजे. तो चुकत असेल तर त्याला ओरडण्याऐवजी काही गोष्टी शिकवा.जेणेकरुन केलेली चुक तो पुन्हा पुन्हा करणार नाही.

- Advertisement -

चुकीचे वागल्यानंतर इग्नोर करणे
जर तुमचे मुलं चुकीचे वागले तर त्याकडे दु्र्लक्ष करु नका. यामुळे त्याला शिस्त लागण्याऐवजी तो अधिकच बिघडेल. मुलं काही चुकीचे करत असेल आणि तुम्ही त्याकडे कानाडोळा केला तर त्याला असे वाटेल की तुमचे अटेंशन मिळवण्यासाठी हे असेच केले पाहिजे.

लक्ष दुसरीकडे वळवा
एक ते तीन वर्षाच्या मुलांना शिस्त शिकवण्यासाठी त्यांचे लक्ष नेहमीच दुसरीकडे वळवणे बेस्ट पर्याय आहे. जेव्हा तुमचे एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असेल आणि तुमचे बोलणे ऐकण्यास तयार नसेल तर त्याला एखादे खेळण किंवा गाण्याच्या मदतीने त्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा.


हेही वाचा- Relationship: मुलांना परिक्षेत कमी मार्क्स मिळाले तर कसं handle कराल?

- Advertisment -

Manini