Wednesday, September 27, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health PCOS Awareness Month: पीसीओएसचा त्रास असणाऱ्या महिलांनी खाऊ नयेत 'हे' फूड्स

PCOS Awareness Month: पीसीओएसचा त्रास असणाऱ्या महिलांनी खाऊ नयेत ‘हे’ फूड्स

Subscribe

पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम ज्याला सर्वसामान्यपणे पीसीओएस नावाने ओळखले जाते. हा महिलांमध्ये होणारा गंभीर आजार आहे. डब्लूएचओच्यानुसार, जगभरात प्रजनन वयाच्या अनुमानित 8-13 टक्के महिला पीसीओएसने प्रभावित आहेत. याच समस्येप्रति जागृकता निर्माण करण्यासाटी प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यात पीसीओएस जागृकता महिना साजरा केला जातो. अशातच पीसीओएसच्या समस्येपासून दूर राहण्याासठी तुम्ही पुढील काही फूड्स खाणे टाळले पाहिजेत.

साखरयुक्त फूड्स आणि ड्रिंक्स
अधिक साखर खाल्ल्याने इंन्सुलिन रेजिस्टेंस होऊ शकतो. जो पीसीओएस असणाऱ्या महिलेत सामान्य आहे. अशातच या समस्येदरम्यान गोड स्नॅक्स, सोडा आणि साखरयुक्त ड्रिंक्सचे अधिक सेवन करु नये.

- Advertisement -

रिफाइन्ड कार्बोहाइड्रेट
सफेद ब्रेड, सफेद तांदुळ किंवा पास्ता सारखे रिफाइन्ड फूड्समुळे ब्लड शुगरचा स्तर वेगाने वाढू शकतो. या फूड्स शिवाय तुम्ही कडधान्यांची निवड करा. त्यात अधिक फायबर असते. ब्लड शुगर यामुळे स्थिर होण्यास मदत होते.

- Advertisement -

हाय ग्लाइसेमिक इंडेक्स असणारे फूड्स
हाय ग्लाइसेमिक इंडेक्स असणारे फूड्स वेगाने शरीरात साखरेचे प्रमाण वाढवतात आणि इंसुलिन रेजिस्टेंस बिघडला जातो. अशातच पीसीओएस असणाऱ्या महिलांनी हाय-ग्लाइमेसिक इंडेक्स असणारे फूड्स जसे व्हाइट बटाटा, कॉर्नफ्लेक्स पासून दूर राहिले पाहिजे.

डेअरी प्रोडक्ट्स
पीसीओएसने पीडित असलेल्या महिलांनी डेअरी प्रोडक्ट्स खाणे टाळले पाहिजे. यामुळे हार्मोनल असंतुलन वाढण्याची शक्यता असते. अशातच तुम्ही डेअरी प्रोडक्ट्सऐवजी बादाम किंवा सोया मिल्कचा वापर करत असाल तर फायदेशीर ठरेल.

तळलेले पदार्थ
तळलेल्या पदार्थात नेहमीच अनहेल्दी फॅट्स असतात. त्यामुळे सूज आणि वजन वाढू शकते. अशातच पीसीओएसची लक्षण बिघडू शकतात.


हेही वाचा- ‘हे’ संकेत सांगतात तुम्ही थकले आहात

 

- Advertisment -

Manini