Thursday, April 25, 2024
घरमानिनीHealthPCOS उपचारानंतर पुन्हा होऊ शकतो का?

PCOS उपचारानंतर पुन्हा होऊ शकतो का?

Subscribe

पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम हा महिलांना होणारा सर्वसामान्य आजार आहे. सध्याच्या काळात बहुतांश महिला या आजाराचा सामना करत आहेत. अशी स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा महिलांच्या शरिरात हार्मोन्सचा स्तर बिघडला जातो. या स्थितीत महिलांच्या प्रजनन अवयवयात सिस्ट बनवतात. पॉलीसिस्टिक ओवरीत जवळजवळ ८ फॉलिकल्स असतात. त्याचसोबत अविकसित फॉलिकल्सची एक पिशवी असते. ज्यामध्ये अंडी विकसित होतात. पीसीओएसमध्ये या पिशवित एग रिलीज होऊ शकत नाहीत. त्यामुळेच ओव्युलेशन प्रभावित होते.

या व्यतिरिक्त पीसीओएसने पीडित महिलांना काही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की, अनियमित पीरियड्स, पीरियड्स दरम्यान खुप दुखणे, वजन वाढणे, पिंपल्स, प्रेग्नेंसीसाठी समस्या. परंतु या स्थितीवर यशस्वीपणे उपचार करु शकतो. डॉ. सर्जरी नंतर सिस्टला काढून टाकतात. त्यानंतर औषध आणि हेल्दी लाइफस्टाइलच्या मदतीने पीसीओएसवर उपचार करु शकतो.

- Advertisement -

पीएसओसएने पीडित महिलेला नेहमीच चिंता वाटत असते की, पीसीओएसच्या उपचारानंतर सुद्धा तो पुन्हा होऊ शकतो का? याच बद्दल तज्ञ काय म्हणतात हे पाहूयात.

तज्ञ असे म्हणतात की, उपचारानंतर पीसीओएसची लक्षण पुन्हा दिसू शकतात. यामागे काही कारण असतात. जसे की, पीसीओएस हार्मोनल असंतुलनाच्या कारणामुळे होणारी स्थिती, जसे की, वाईट सवयी, वेळेवर काही गोष्टी न खाणे असे काही. उपचारानंतर पुन्हा तुम्ही अनहेल्दी लाइफस्टाइल फॉलो करत असाल तर तुम्हाला पुन्हा पीसीओओएसची लक्षण दिसून येऊ शकतात.

- Advertisement -

पीसीओएस पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही हेल्थी आहार घ्या, नियमित व्यायाम करा. तसेच अधिक ताण घेऊ नका. या व्यतिरिक्त औषध वेळेवर घेत जा. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आरोग्य तपासणी ही करा. हेल्थी लाइफस्टाइल फॉलो करुन सुद्धा तुम्ही या समस्येपासून दूर राहू शकता.


हेही वाचा- वेळेवर Periods येत नसतील तर काय करावे?

- Advertisment -

Manini