घरताज्या घडामोडीकोरोना लस घेतल्यानंतर ३ दिवस सेक्स करू नका, डॉक्टरांचा सल्ला

कोरोना लस घेतल्यानंतर ३ दिवस सेक्स करू नका, डॉक्टरांचा सल्ला

Subscribe

संपूर्ण जगभरात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लस ही महत्त्वाची अस्त्र आहे. त्यामुळे जगभरात मोठ्या स्तरावर लसीकरण केले जात आहे. त्यामुळे लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर काही गोष्टींवर जास्त लक्ष्य देण्यास तज्ज्ञ सल्ला देत आहेत. अजून एक महत्त्वाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, तो म्हणजे कोरोना लस घेतल्यानंतर ३ दिवस सेक्स करू नका. हो हे खरं आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, रशियामधील लोकांना लसीचा डोस घेतल्यानंतर कमीत कमी तीन दिवस सेक्स न करण्याचा सल्ला दिला जात आहे.

सेराटोव या रशियामधील मोठ्या शहराचे उप आरोग्यमंत्री डॉक्टर डेनिस ग्रेफर यांनी रशियाच्या लोकांना लसीचा डोस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची शारिरीक मेहनत म्हणजे ज्या कामात जास्त शारिरीक क्षमतेचा वापर होईल असे काम न करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये सेक्सचा देखील समावेश आहे. यापूर्वी येथील लोकांना लस घेतल्यानंतर दारू आणि सिगारेटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

- Advertisement -

रशिया अशा देशांपैकी एक आहे, जिथे लसीकरण करण्याचे प्रमाण कमी आहे. येथे आतापर्यंत फक्त १३ टक्के लोकांना लसीचे दोन डोस दिले गेले आहेत. एका पत्रकार परिषदमध्ये डॉक्टर ग्रेफर म्हणाले की, ‘सेक्स करताना खूप क्षमता लागते हे प्रत्येकालाच माहित आहे. त्यामुळे आम्ही लोकांना लस घेतल्यानंतर सेक्ससारख्या शारिरीक संबंधित गोष्टींपासून दूर राहण्याचा इशारा देत आहोत.’

पण ग्रेफर यांच्या या विधानावर रशियन माध्यमांमध्ये टीका होत आहे. तेथील सीनिअर मेडिकल ऑफिशियल ओलेग कोस्टिन म्हणाले की, ‘ते ग्रेफर यांच्या मताशी सहमत नाही आहेत. लस घेतल्यानंतर पूर्णपणे सेक्स बंद करण्याऐवजी सावधगिरी बाळगून सेक्स करू शकता. पण हे गरजेपेक्षा जास्त असले नाही पाहिजे.’

- Advertisement -

दरम्यान भारतामध्ये लसीकरणानंतर अशाप्रकारची कोणतीही अधिकृत गाईडलाईन जारी केली नाही आहे. पण यूनिसेफकडून लस घेतल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. यूनिसेफने सांगितले आहे की, लस घेतल्यानंतर २ ते ३ दिवस कोणत्याही प्रकारच्या शारिरीक अॅक्टिव्हीटीपासून दूर रहिले पाहिजे. तसेच यूनिसेफने अल्कोहोल आणि तंबाखूचे सेवन न करण्याचा देखील सल्ला दिला आहे. कारण दारू आणि सिगारेट लसीच्या साईड इफेक्टला वाढवते. तसेच दारूचा रोगप्रतिकारशक्तीवर चांगला असर होत नाही, ज्यामुळे लसीचा शरीरावर कमी प्रभाव होतो.


हेही वाचा – दूध पिल्यानेही होऊ शकतो डायबिटीज आणि हृदयरोग


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -