Friday, March 1, 2024
घरमानिनीHealth'या' समस्या असणाऱ्यांनी पिऊ नये हळदीचे दूध

‘या’ समस्या असणाऱ्यांनी पिऊ नये हळदीचे दूध

Subscribe

अनेकदा आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदीच्या दुधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कारण शरीरासाठी हळदीचे दूध पिणे खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे डॉक्टरांकडूनही हळदीच्या दुधाचे सेवन करण्यास सांगतात. हळदीच्या दुधाचे इम्युनिटी वाढण्यासह, एन्टी-बायोटिक, एन्टी-इंफ्लेमेटरी आणि एन्टी-ऑक्सिडेंट गुणधर्मांसह आरोग्याला अनेक फायदे आहेत. आयुर्वेदानुसार, हळदीचे दूध आरोग्यासाठी उत्तम मानले जात असले तरीही काही व्यक्तींसाठी या दूधाचे सेवन करणे अयोग्य मानले जाते.

‘या’ व्यक्तींनी कधीही पिऊ नका हळदीचे दूध

6 turmeric milk benefits you should know about | GQ India

- Advertisement -

 

  • तुम्हाला जर कप साठून राहत असल्याची समस्या असल्यास किंवा कफ बाहेर पडत नसल्यास हळदीचे दूध पिऊ नये. कारण, कफ बाहेर पडत नसल्यास, त्यात हळदीचे दूध प्यायल्यास कफ आतच राहतो.
  • श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा श्वास घेताना छातीत दुखत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिऊ नये.
  • हळदीमध्ये असणाऱ्या गुणांमुळे आपली श्वसन संस्था अतिसक्रिय होते. त्यामुळे श्वास घेण्याची समस्या उद्भवू शकते.
  • श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या असल्यास किंवा पंप वापरत असल्यास चुकूनही रात्री हळदीचं दूध पिऊ नये.

हळदीचे दूध कोणी प्यावे?

15 Incredible Turmeric Milk (Haldi Milk) Benefits and How to Make It!

- Advertisement -

 

  • ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशांनी सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी हळदीचे दूध प्यावे. हळदीमध्ये जंतूनाशक गुणधर्म असल्याने घशातील खवखव कमी करते.
  • गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी हळदीचे दूध प्यायल्याने शरीरातील सांधे बळकट होतात आणि गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. तसेच वेदना कमी झाल्याने सांधेदुखी रुग्णांच्या शरीरातील स्नायूंची लवचिकता वाढते.
  • ज्यांनी शांत झोप लागत नाही त्यांनी झोपण्यापूर्वी तासभर आधी ग्लासभर गरम दूध प्यायल्यास शांत झोप मिळण्यास मदत होते. दुधातील सेरोटोनीन व मेलॅटोनीन ताण कमी करतात.
  • ज्या स्त्रियांना मासिकपाळी दरम्यान त्रास होतो, अनियमित पाळी येते. अशा स्त्रियांनी नेहमी हळदीचे दूध प्यावे.

हेही वाचा :

दही आंबट होऊ नये म्हणून वापरा ‘ही’ ट्रिक

- Advertisment -

Manini