प्रत्येक स्त्रीला आपल्या जोडीदारासोबत खास डिनर डेटवर जाताना आकर्षक आणि सुंदर दिसण्याची स्वाभाविक इच्छा असते. हा क्षण तिच्यासाठी खूप खास असतो सुंदर पोशाख, परफेक्ट मेकअप, आणि दिलखुलास हास्य या सगळ्याच गोष्टी या खास क्षणाला परिपूर्ण बनवतात. अशावेळी स्त्रीचं सौंदर्य आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. बऱ्याचदा आपण डिनर डेटला वनपीस ड्रेस घालतो. परंतु यावेळी तुम्हाला हटके काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही हे, लॉन्ग ड्रेसेस निश्चितपणे ट्राय करू शकता. आज आपण जाणून घेऊयात, डिनर डेटसाठी कोणते लॉन्ग ड्रेसेस आपण स्टाइल करू शकतो.
तुम्हाला लॉन्ग ड्रेसमध्ये देखील असंख्य प्रकार मिळतील. जर तुम्ही हे लॉन्ग ड्रेसेस योग्यरित्या स्टाइल केले तर हे ड्रेस खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. हे ड्रेसस तुम्हाला ऑनलाइन आणि मार्केटमध्ये दोन्ही ठिकाणी मिळेल.
मॅक्सी ड्रेस
जर तुम्हाला ब्राइट कलर घालायला आवडत असतील तर तुम्ही हा ड्रेस घालू शकता. हा ड्रेस लॉन्ग असून तुम्हाला एक आकर्षक लूक देखील मिळेल. तुमच्या डेट नाइटसाठी हा ड्रेस उत्तम आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन हा ड्रेस तुम्हाला 1,000 रुपयांपर्यत मिळेल.
फ्लोरल डिजाइन मॅक्सी ड्रेस
फ्लोरल असलेले ड्रेस खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. या ड्रेसमुळे तुम्हाला स्टायलिश आणि सुंदर लूक मिळेल. हल्ली बऱ्याच लोकांना हे ड्रेस घालायला खूप आवडतात.
एम्बेलिश्ड वर्क ड्रेस
एम्बेलिश्ड वर्क ड्रेस डेट नाइटसाठी उत्तम आहे. अशा प्रकारचे लॉन्ग ड्रेस खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. या ड्रेसवर तुम्ही ज्वेलरी घालून हा ड्रेस स्टाइल करू शकता. हा ड्रेस ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी 2,000 रुपयांना मिळेल.
रफल डिजाइनर ड्रेस
जर तुम्हाला लाइट किंवा पेस्टल रंग आवडत असतील तर तुम्ही हे रफल डिजाइन असलेले ड्रेस घालू शकता. हे ड्रेस तुम्हाला लाइट किंवा पेस्टल कलरमध्ये मिळतील. या ड्रेसवर तुम्ही फ्लॅट्स घालू शकता.
हेही वाचा : Fashion Tips : ऑफिसमध्ये या स्टाइलने साडी करा कॅरी
Edited By : Prachi Manjrekar