Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Relationship परफेक्ट पॅरेंटिंगसंबंधित 'या' गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता का?

परफेक्ट पॅरेंटिंगसंबंधित ‘या’ गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता का?

Subscribe

मुलांना जन्म दिल्यापासून ते त्यांच्या पालपोषणापर्यंतच्या प्रवासात पालकांना फार मोठी भुमिका पार पाडावी लागत. सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येक पालकाला आपण परफेक्ट पॅरेंट असावे असे वाटते. मात्र अशातच काही पालक अशी चुक करतात की, त्यांना मुलांनी उत्तम गोष्टी कराव्या असे वाटते. पण त्यासाठी ते त्यांच्याशी कठोर वागतात. याचा परिणाम नकळतपणे मुलांवर होतो याकडे पालक कधीकधी दुर्लक्ष करतात.

मुलांसोबत कठोर वागले पाहिजे
काही पालक डोळेबंद करुन दुसरी लोक आपल्या मुलांशी कशी वागतात त्याचे अनुसरण करतात. मुलांचा अभ्यास ते करियर संबंधितच्या काही गोष्टींमध्ये ते कठोर भुमिका घेतात. यामुळे मुलं आपल्या अभ्यासावक किंवा करियरवर पूर्णपणे लक्ष देत नाहीत. अशातच पालकांनी त्यांच्याशी कठोरपणे वागण्याऐवजी मैत्रीचे नाते तयार करून वागावे. असे केले नाही तर मुलं तुमच्यापासून दूरावली जातील.

- Advertisement -

परफेक्ट पॅरेंट होणे गरजेचे
बहुतांश पालक एक उत्तम व्यक्ती होण्याच्या नादात स्वत:ला परफेक्ट पॅरेंट्स होण्याचा प्रयत्न करतात. हे खरं आहे की, पालकांना पाहूनच मुलं शिकतात. मात्र याचा अर्थ असा होत नाही की, तुम्हाला परफेक्ट पॅरेंट व्हायचे आहे म्हणून तुम्ही मुलांवर दबाव टाकाल. जगातील कोणताही व्यक्ती हा परफेक्ट नसतो हे लक्षात ठेवले पाहिजे.

मुलांची अडवणूक करणे
मुलांना वारंवार काही गोष्टी करण्यापासून अडवणे चुकीचे आहे. असे केल्याने मुलांच्या मनात भीतीची भावना निर्माण होऊ शकते. याच कारणास्तव त्यांच्यामधील आत्मविश्वास ही कमी होतो आणि ते तुमच्यापासून दूरावले जाऊ शकतात.

- Advertisement -

मुलांना घरच्या गोष्टींपासून दूर ठेवावे
बहुतांशजण असा सल्ला देतात की, मुलांना घरातील काही गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांच्यासमोर तुमच्या समस्या बोलून दाखवू नका. यामुळे त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो. त्याचे अभ्यास लक्ष कमी लागू शकते. अशातच पालकांनी परफेक्ट पॅरेंट होण्याच्या नादात ही चुक कधीच करू नये.


हेही वाचा- मुलांमध्ये नैराश्याचे ‘हे’ आहेत संकेत

- Advertisment -

Manini