लग्न किंवा पार्टीला जाण्यासाठी महिलांना साड्या नेसायला खूप आवडतात. साड्यांमध्ये सुद्धा तुम्हाला असंख्य प्रकार मिळतील. ऑफिसमध्ये बऱ्याचदा अनेक कार्यक्रम किंवा काही ऑफिस इव्हेंटस असतात. या ऑफिस इव्हेंटसाठी आपलं प्रेझेंनटेबल असणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण या लेखातून ऑफिस इव्हेंटसाठी कोणत्या खास साड्या कोणत्या सुंदर डिझाइन्सची निवड करू शकतो ते जाणून घेऊयात.
ऑर्गेंजा
ऑफिसच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही या प्रकारची ऑर्गेंजा साडी स्टाइल करू शकता. या साडीमध्ये तुम्हाला अनेक प्रकार आणि रंग मिळतील. या साड्या तरुण मुलींवर खूप दिसतात. या तुम्ही दोन्ही ठिकाणी घेऊ शकता . या साड्या तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही ठिकाणी 1,००० ते 2००० रुपयांना खरेदी करू शकता. या साडीत तुम्ही सुंदर दिसाल.
एम्ब्रॉयडरी वर्क
जर तुम्हाला सुंदर आणि आकर्षक लूक पाहिजे असेल तर तुम्ही असे एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या साड्या नेसू शकता. तुम्हाला या प्रकारची साडी अनेक रंग आणि डिझाइन पर्यायांमध्ये मिळेल. ही साडी तुम्ही ब्लाउज किंवा स्ट्रॅप्ससह घालू शकता.ही साडी तुमच्या लूकमध्ये भर घालेल आणि तुम्ही ही साडी तुम्हाला साधारणपणे 1,5०० रुपयांना खरेदी करू शकता.
फ्लोरल प्रिंट साड़ी
हल्ली फ्लोरल प्रिंटचा ट्रेंड खूप चर्चेत आहे. या साड्या खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. या साड्यांमध्ये पेस्टल कलर जास्त उठून दिसतात. यामध्ये तुम्हाला अनेक फ्लोरल प्रिंट डिझाइन्स मिळतील. तुमच्या आवडीनुसार तुम्ही या साड्यांची निवड करू शकता. या साडीत तुमचा लूक खूप सुंदर आणि वेगळा दिसेल. ही साडी तुम्हाला अनेक पॅर्टनमध्ये मिळेल. ही साडी तुम्हाला 2००० पर्यत मिळेल.
स्टायलिंग टिप्स
- या साड्यांची निवड ऑफिस इव्हेंटसप्रमाणे तुम्ही करू शकता.
- या साड्या स्टाइल करताना साडीप्रमाणे ज्वेलरीची निवड करा.
- कलर कॉन्ट्रास्ट देखील करू शकता.
हेही वाचा : Fashion Tips : बेस्ट फ्रॉक सूट
Edited By : Prachi Manjrekar