महिलांना अनेकदा पाळीदरम्यान वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. पोटात दुखणे, मूड स्विंग्स, पाठदुखी, मानसिक त्रास, थकवा, सूज येणे अशा सर्व समस्या महिलांना त्रास देत असतात.
पाळीदरम्यान काय खावे ?
हायड्रेटेड ठेवणारी फळे आणि भाज्या :
कलिंगड, काकडी, स्ट्रॉबेरी, संत्री, कोबी, हिरव्या पालेभाज्या आणि पुरेशा प्रमाणात पाणी या दिवसांमध्ये प्यावे. यामुळे डोकेदुखी, थकवा आणि वेदना यापासून वाचता येऊ शकते.
आल्याचा चहा :
आल्याचा चहा हा अँटिइंफ्लेमेटरी असतो. यामुळे मांसपेशीमधील वेदना कमी होऊ शकतात.
आयर्न, प्रोटीन आणि ओमेगा-3 असलेले खाद्य :
चिकनमुळे पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. आणि माशांच्या माध्यमातून ओमेगा-3 मिळते. पाळीच्या दिवसात आयर्नचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. यामुळे थकवा येऊ शकतो. यासाठीच आयर्नचे प्रमाण वाढवू शकणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
हळद :
हळदीमध्ये असणारे करक्यूमिन हे एक अँटिऑक्सिडंट आहे. करक्यूमिनच्या कॅप्सूल्सही मिळतात. पाळीच्या त्रासांवर उपाय म्हणून हळद गुणकारी ठरू शकते. डिप्रेशनवरही हळद काम करते यामुळे आपला मूड चांगला राहतो. तुम्ही हळदीचे दूध पिऊ शकता किंवा हळद चहामध्ये टाकून तेही पिऊ शकता.
डार्क चॉकलेट्स :
डार्क चॉकलेट्समध्ये पुरेशा प्रमाणात आयर्न आणि मॅग्नेशिअम असते. 100 ग्रॅमच्या डार्क चॉकलेटपासून 67 % आयर्न आणि 58 % मॅग्नेशिअमची एका दिवसाची गरज पूर्ण होते. पाळीच्या दिवसांमध्ये या मिनरल्सची कमतरता पूर्ण केली जाऊ शकते.
नट्स :
बदाम, काजू , अक्रोड इत्यादी ड्रायफ्रूट्स मध्ये पुरेशा प्रमाणात
प्रोटीन्स आणि ओमेगा -3 मिळतात. जर तुम्हाला हे असेच खायला आवडत नसतील तर तुम्ही या पदार्थांपासून स्मूदी बनवून तीदेखील पिऊ शकता.
दूध किंवा दही :
काही महिलांना पाळीदरम्यान यीस्टचे इन्फेक्शन होते. अशावेळी दही हा एक चांगला प्रोबायोटिकचा स्रोत असल्यामुळे या इन्फेक्शन विरुद्ध लढण्यासाठी मदत करू शकतो. दूध आणि दही यांच्यामुळे शरीराला प्रोटीन्स आणि कॅल्शिअम मिळतात.
पाळीदरम्यान काय खाऊ नये ?
मीठ :
जास्त मीठ कधीच खाऊ नये. पाळीदरम्यान जास्त मीठ खाल्ल्यास शरीरात पाणी जमा होऊ लागते. ज्यामुळे पोटात सूज किंवा गच्च वाटणे अशा समस्या निर्माण होतात. अशावेळी प्रोसेस्ड फूड खाणेदेखील टाळावे.
साखर :
योग्य प्रमाणातील साखरेमुळे काहीच अपाय होत नाही. परंतु जास्त साखर खाल्ल्यामुळे मूड स्विंग्स अधिक प्रमाणात होतात.
अल्कोहोल :
पाळीमध्ये अल्कोहोलचे सेवन न करणेच फायदेशीर ठरू शकते. अल्कोहोलमुळे पाळीच्या समस्या वाढू लागतात. जसे की डीहायड्रेशन, डोकेदुखी. याच्या हँगओव्हरमुळे थकवा जाणवू लागतो.
कॉफी :
जर तुम्ही कॉफी अॅडिक्ट असाल तर याचे प्रमाण कमी कमी करत जा. वाटल्यास केवळ 1 ते 2 कपच कॉफी प्या. कॉफीमुळे पचनक्रियेवर परिणाम पडतो. कॉफीमुळे शरीरात अनावश्यक प्रमाणात पाणी जमा होऊ लागते. ज्यामुळे ब्लोटिंगची समस्या निर्माण होते.
मसालेदार पदार्थ :
जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यास देखील त्याचा आपल्या पचनसंस्थेवर परिणाम पडतो. यामुळे पोटदुखी,उलट्या, जुलाब अशा समस्या उद्भवतात.
हेही वाचा : Cinnamon : दालचिनीचे सेवन महिलांसाठी वरदान
Edited By – Tanvi Gundaye