Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Health Period Panty चा वापर करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी

Period Panty चा वापर करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Subscribe

जुन्या काळात पीरियड्स दरम्यान महिला या कापडाचा वापर करायचे. त्यानंतर बदलत्या काळानुसार पॅड्सचा वापर करण्यास सुरुवात झाली. सॅनेटरी पॅड्स महिलांसाठी खुप फायदेशीर मानले जाते. परंतु ते पर्यावरणासाठी नुकसान पोहचवतात. सॅनेटरी पॅड्सच्या वरच्या बाजूस प्लास्टिक आणि अशा काही गोष्टींचा वापर केला जातो ते मातील विघटन होऊ शकत नाही. काही वेळेस सॅनेटरी पॅड्सचा वापर केल्याने कपड्यांवर डाग लागण्याची भीती सुद्धा असते. हेच कारण आहे की, सध्या बाजारात पॅड्ससाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. जसे की, टॅम्पॉन, मेंस्ट्रुल कप, पीरियड्स पँन्टी. अशातच आज आम्ही तुम्हाला पीरियड्स पँन्टीज बद्दल अधिक सांगणार आहोत. (Period panties use tips)

तुमच्या मैत्रीणींपैकी कोणतरी पीरियड पँन्टीजचा वापर करत असेल. खरंचर पॅड्स, टॅम्पॉन आणि मेंस्ट्रुस कपच्या तुलनेत पीरियड पॅंन्टीजचा वापर करणे अगदी सोपे आहे. खरंतर अशा मुलींनी याचा वापर करु नये ज्यांना पहिल्यांदाच पीरियड्स आले आहेत आणि त्यांची आई याबद्दल खुलेपणाने बोलण्यास नकार देते. तर पाहूयात नक्की पीरियड पँन्टीजचा वापर कसा करावा.

- Advertisement -

Period panties use tips
Period panties use tips

पीरियड पँन्टीज म्हणजे काय?
पीरियड पँन्टीज एक सामान्य पँन्टी प्रमाणेच आहे. परंतु त्या बनवण्यासाठी थोडा वेगळा कापड वापरला जातो. बहुतांश पीरियड पँन्टीज तयार करण्यासाठी माइक्रोफायबर पॉलिएस्टर कापडाचा वापर केला जातो. माइक्रोफायबर पॉलीएस्टर कापडामुळे पीरियड पँन्टीज केवळ मेंस्ट्रुअल ब्लड ऑब्सर्व करत तर ड्राइनेसचा सुद्धा अनुभव देतात. सध्या मार्केटमध्ये विविध ब्रँन्ड्स आणि कंपन्यांचे पीरियड्स पँन्टीज उपलब्ध आहेत. (Period panties use tips)

- Advertisement -

पीरियड पँन्टीजच्या वापरासंबंधित महत्वाच्या गोष्टी
-सॅनेटरी पॅड, टॅम्पॉन आणि मेंस्ट्रुअल कप्सच्या तुलनेत पीरियड पँन्टीजचा वापर अधिक सोपा आहे. याचा वापर करताना काही गाईडलाइन्स फॉलो कराव्या लागत नाहीत. तुम्ही ती नॉर्मल पॅंन्टी प्रमाणे घालू शकता.
-प्रवासादरम्यान सॅनेटरी पॅड्स, टॅम्पॉन लावणे थोडे मुश्किल होते. यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पाउचची गरज भासते. पण पीरियड पँन्टीज तुम्ही नॉर्मल कपड्यांसोबत घेऊन जाऊ शकता.
-सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पॉन सरकले तरीही डाग लागण्याची शक्यता असते. पीरियड पँन्टीचा वापर करताना याची भीती नसते.
-सॅनेटरी पॅड आणि टॅम्पॉनचा वापर केल्याने दुर्गंधी येण्याची शक्यता असते. पण पीरियड पँन्टीत दुर्गंध कंट्रोल करण्यास मदत करते.
-या पँन्टीजचा वापर केल्यास तुमचा पॅड्स खरेदी करण्याचा खर्च वाचेल. या पँन्टी वापल्यानंतर तुम्ही त्या स्वच्छ धुवून पुन्हा वापरु शकता. खरंतर या पँन्टी 2 वर्षांपर्यंत तु्म्ही वापरु शकता.


हेही वाचा- पीरियड्सवेळी Pad रॅशेसपासून अशी मिळवा सुटका

- Advertisment -

Manini