Thursday, April 25, 2024
घरमानिनीHealthपीरियड्सच्या गोळ्यांनी होतात side effects

पीरियड्सच्या गोळ्यांनी होतात side effects

Subscribe

तारुण्यात आल्यानंतर प्रत्येक मुलीला पीरियड्स येण्यास सुरुवात होते. पीरियड्स येणे ही सर्व महिलांमधील सामान्य बाब असून ते वयाच्या 40-45 वर्षापर्यंत असतात. प्रत्येक महिन्याला वेळेवर पीरियड्स येत राहतात. पण काही वेळेस असे होते की, एखादा धार्मिक सण, लग्न असेल आणि त्याच दरम्यान पीरियड्सची तारीख असेल तर पंचायत होते. अशा वेळी बहुतांश महिला या पीरियड्स पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतात. यामुळे तुमचे पीरियड्स पुढे ही जातात. पण याचा वारंवार वापर केला तर आरोग्यावर दुष्परिणाम ही होतात. (Medicines for periods)

प्रत्येक महिलेची मंथली सायकल ही 28 दिवसांची असते. जर तुम्हाला वेळवर पीरियड्स येत नसतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार केले पाहिजेत.

- Advertisement -

पीरियड्सची तारीख पुढे ढकलणाऱ्या गोळ्या घेतल्याने शरिरातील हार्मोन्स संतुलित होतात. यामध्ये नॉर एथिस्टेरोन आढळले जाते, ज्यामध्ये प्रोजेस्टेरोनचे औषध असते. प्रोजेस्टेरोन एक प्रकारचे फिमेल हार्मोन असून जो या औषधांमुळे वाढला जातो. याचा स्तर वाढण्यासह गर्भाशयावर असलेल्या लेअरचा स्तर कमी होऊ लागतो. अशातच पीरियड्स येत नाही. या गोळ्या घेण्यास बंद केल्यानंतर शरिरात हार्मोनचा स्तर सामान्य होण्यास वेळ लागतो. तसेच त्याच्या 3-4 दिवसांनी पीरियड्स येतात. विविध लोकांवर याचा परिणाम ही वेगवेगळा होताो.

Medicines for periods
Medicines for periods

कधी घेतल्या जातात या गोळ्या
या गोळ्या नेहमीच डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या जातात. बहुतांश महिलांना या गोळ्या पीरियड्स येण्याच्या तीन दिवस आधी दिल्या जातात.(Medicines for periods)

- Advertisement -

गोळ्यांमुळे होणारे दुष्परिणाम
बहुतांश प्रकरणात पीरियड्सची तारीख पुढे ढकलण्याच्या गोळ्या खाल्ल्या जातात. परंतु यामुळे अधिक समस्या येत नाहीत. मात्र जेव्हा गरज नसेल तेव्हा अशा प्रकारच्या गोळ्यांचा सेवन करण्यापासून दूर रहावे. याचा अधिक वापर केल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.

-या गोळ्या घेतल्याने नैसर्गिक हार्मोन फ्लो बिघडला जातो. अशातच पीरियड्स अनियमित येतात.
-या गोळ्यांमुळे त्वचेवर रॅशेज, पिंपल्स ही येऊ शकतात.
-चक्कर येणे, डोके दुखी, माइग्रेनची समस्या ही उद्भवू शकते.
-वजन वाढले जाते
-लीवर संबंधित समस्या उद्भवू शकते आणि पुढे जाऊन जीवघेणी सुद्धा ठरु शकते


हेही वाचा- Dehydration चा पिरियडवर होतो परिणाम

- Advertisment -

Manini