उन्हाळ्यात उष्ण हवामानामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. पण या दिवसात मासिक पाळीमद्ये महिलांना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये पीरियड्समध्ये इन्फेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, त्यामुळे प्रत्येक महिलेने या दिवसात पीरियड्स हायजीनकडे दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांनुसार महिलांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी ते बघूया.
आरामदायक आणि स्वच्छ अंतर्वस्त्र
उन्हाळ्यात शरीराला घाम येतो. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. प्रामुख्याने त्वचेशी संबंधित विकार बळावतात. यामुळे परियडस् दरम्यान महिलांनी घट्ट अंतर्वस्त्र घालू नये. ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
सॅनिटरी नॅपकिन्स
सॅनिटरी नॅपकिन अर्धा तासाने किंवा फ्लो नुसार बदलत राहावे. खूप वेळ एकच पॅड वापरल्यास त्यावर बॅक्टेरिया तयार होतात. त्यामुळे चिडचिड, त्वचेवर लालसरपणा अशा अनेक समस्या निर्माण होतात.
प्रायव्हेट पार्टची स्वच्छता
उन्हाळ्याच्या हंगामात, सॅनिटरी नॅपकिन फार वेळ राहील्यास त्यामध्ये बॅक्टेरियांची निर्मिती होते. त्याचे इन्फेशन होण्याचा धोका वाढतो. यामुळे प्रायव्हेट पार्टची योग्य स्वच्छता ठेवावी. त्यासाठी अँटिसेप्टिक पावडर वापरू शकता
हायड्रेटेड रहा
उन्हाळ्यात हायड्रेट राहण्याची गरज असते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि शरीराचे पीएच संतुलन राखण्यासाठी दररोज किमान 8-10 ग्लास पाणी पिणे महत्वाचे आहे. बेरी आणि हर्बल पाणी प्यावे.
सुती पॅन्टी
उन्हाळ्यात सुती अंडरगारमेंट्स, विशेषतः कॉटन पॅन्टीज घालणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात कॉटन बॉटम वेअर्सही आरामदायक असतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि कोरडी राहण्यास मदत होते. या काळात कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले कपडे आणि अंतर्वस्त्रे घालू नये. यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात. त्वचेवर खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते.