पीरियड्स ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जी प्रेग्नेंसीसाठी फार गरजेची असते. महिलांना प्रत्येक महिन्याला पीरियड्स येतात. यावेळी पोटात दुखणे, कंबर दुखी, पाय दुखणे अशा समस्या होतात. काही महिलांना पीरियड्समध्ये फार त्रास सुद्धा होतो. पीरियड्समध्ये पेन होण्याची समस्या सर्व महिलांना होतो. मात्र या दुखण्यापासून आराम मिळावा म्हणून काही घरगुती उपचार ही केले जातात. मात्र काही रिसर्चमध्ये महिलांना व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ दिले ज्यामुळे त्यांना पीरियड्स क्रॅम्प्स पासून आराम मिळाल्याचे दिसून आले.
शरिराला व्हिटॅमिन डी मिळवायचे असेल तर सर्वाधिक पद्धत म्हणजे सुर्यकिरणं. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांते सेवन सुद्धा करु शकता. मात्र व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर त्याचा परिणाम पीरियड सायकलवर होतो. परंतु व्हिटॅमिन डी आणि पीरियड्स दरम्यानचा नक्की संबंध काय यावर अधिक सविस्तर रिसर्च करण्याची गरज असते.
यापूर्वी काही रिसर्चमध्ये समोर आले आहे की, पीरियड्समध्ये खुप दुखत असेल तर त्यामागे काही पोषक तत्वांची कमतरता हे सुद्धा एक कारण असू शकते. अशातच काही पोषक तत्त्व हे पीरियड्स पेन वाढवण्याचे कारण ठरु शकतात आणि आपल्या शरिराला कोणत्याही स्थितीत या पोषक तत्वांची कमतरता होऊ देऊ नये.
-मॅग्नेशियम
मॅग्नेशियमचा स्तर योग्य नसेल तर पीरियड्समध्ये खुप दुखते. त्यामुळे शरिरात जर मॅग्नेशियमचा स्तर वाढवायचा असेल तर महिलांनी हिरव्या भाज्या, नट्स सारखे मॅग्नेशियम खाद्य पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
-ओमेगा-3 फॅटी अॅसिड
ओमेगा-3 फॅटी अॅसिड हे पीरियड्समध्ये महिलांच्या फार कामी येते. यामुळे पीरियड्स दरम्यान होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो. मासे, अळशी आणि चिया सीड्स हे ओमेगा-3 फॅटी अॅसिडचा उत्तम स्रोत आहे.
-कॅल्शिअम
कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे पीरियड्समध्ये खुप दुखते. यामुळे महिलांनी आपल्या डाएटमध्ये कॅल्शिअमचे सेवन जरुर केले पाहिजे. यामध्ये डेअरी प्रोडक्ट्स, नट्स, हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.
हेही वाचा- पीरियड्स दरम्यान अधिक थकवा येतो? करा हे काम