आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण झाले आहे. विशेषत:त्या महिलांसाठी, ज्या घरात आणि ऑफिसमध्ये व्यस्त असतात, परंतु स्वत:ला सुधारण्यासाठी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी स्वतःकरता थोडा वेळ बाजूला काढणे खूप महत्वाचे आहे.
एखादा छंद जोपासणं केवळ तुम्हाला आनंदी ठेवत नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासातही ही गोष्ट महत्त्वाची भूमिका बजावते. छंद जोपासल्यामुळे नवीन गोष्टी शिकण्यास, सर्जनशीलता वाढवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते. जाणून घेऊयात अशा काही छंदांविषयी जे तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी मदत करू शकतील.
वाचन :
वाचनाने ज्ञान तर वाढतेच शिवाय तुमची कल्पनाशक्तीही बळकट होते. एक चांगलं पुस्तक तुम्हाला एका नव्या जगात घेऊन जाऊ शकतं आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावू शकतं. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही पुस्तक वाचू शकता, मग ते काल्पनिक असो, नॉन फिक्शन किंवा चरित्र असो.
योग किंवा ध्यान :
योग आणि ध्यान केवळ तुमचे शारीरिक आरोग्यच सुधारत नाही तर हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. तणाव कमी करण्यास, चिंता कमी करण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास योग आणि ध्यानधारणेचा उपयोग होतो. तुम्ही घरी सहज योग किंवा ध्यान करू शकता किंवा योग प्रशिक्षण शिबीर किंवा वर्गातही जाऊ शकता.
लेखन :
लेखन हे एक शक्तिशाली साधन आहे जे तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी, तुमचे विचार व्यवस्थित मांडण्यासाठी आणि तुमची सर्जनशीलता जागवण्यासाठी मदत करू शकते. तुम्ही डायरी लिहू शकता, कविता लिहू शकता किंवा ब्लॉगिंग देखील करू शकता. लेखनामुळे तुमची भाषा आणि अभिव्यक्ती क्षमता सुधारते.
काहीतरी नवीन शिका :
नवनवीन गोष्टी शिकल्याने तुमचे मन तीक्ष्ण राहते आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वातही भर पडते. तुम्ही नवीन भाषा शिकू शकता, नवीन वाद्य वाजवायला शिकू शकता किंवा नवीन कला प्रकार देखील शिकू शकता.
निसर्गाच्या सान्निध्यात रहा :
निसर्गासोबत वेळ घालवल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो. तुम्ही उद्यानात जाऊ शकता, बागेत काम करू शकता किंवा मोकळ्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. निसर्गात वेळ घालवल्याने तुमचा मूड सुधारतो आणि तुम्हाला अधिक उत्साही वाटू लागते.
छंद अंगिकारण्याचे फायदे :
तणाव कमी करते- हे छंद तुम्हाला तणाव कमी करण्यास आणि चिंता दूर करण्यास मदत करतात.
आत्मविश्वास वाढतो- जेव्हा तुम्ही काही नवीन शिकता किंवा काही नवीन काम करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो.
सर्जनशीलता वाढते- छंद जोपासल्यामुळे नवनवीन कल्पना सुचण्यास मदत होते.
आनंद वाढतो – छंद तुम्हाला आनंदी ठेवतात आणि तुमच्या जीवनात संतुलन निर्माण करतात.
काही छंद जे तुम्ही जोपासू शकता :
नृत्य
चित्रकला
संगीत
स्वयंपाक
प्रवास
बागकाम
स्वयंसेवा
हेही वाचा : Kapoor Family : करिश्माला लोलो तर करीनाला बेबो हे नाव कुणी ठेवलं?
Edited By – Tanvi Gundaye