Sunday, May 19, 2024
घरमानिनीPet Care : उन्हाळ्यात तुमच्या सोन्या, मोती, ब्रुनोची अशी घ्या काळजी

Pet Care : उन्हाळ्यात तुमच्या सोन्या, मोती, ब्रुनोची अशी घ्या काळजी

Subscribe

हल्ली घराघरात प्राणी प्रेमी दिसून येतात. मात्र, पेट्सचा सांभाळ करण्यासोबत त्याची योग्यरीत्या काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. विशेष करून उन्हाळयाच्या दिवसात. कडाकाच्या उन्हात जसे आपल्याला उष्माघात, डिहायड्रेशन सारख्या समस्या जाणवतात त्याच समस्या प्राण्यांनाही जाणवतात. त्यामुळे उन्हाळ्यात स्वतःसोबत तुमच्या घरात असणाऱ्या सोन्या, मोती, ब्रूनोची काळजी घ्यायला हवी.

प्राण्यांनाही जाणवतात पुढील समस्या –

डिहायड्रेशन  (Dehydration)

मानवाप्रमाणेच प्राण्यांनाही डिहायड्रेशनचा त्रास उन्हाळ्यात जाणवतो. त्यामुळे तुमचा मोती, ब्रुनो पुरेशा प्रमाणात पाणी पितो का नाही अवश्य तपासा. घरात त्यांना स्वच्छ पाण्याची व्यवस्था करा. वेळोवेळी पाणी स्वच्छ आहे का नाही ते तपासा अस्वच्छ पाणी प्राण्यांना देऊ नका.

- Advertisement -

आहार  (Food)

उन्हाळ्यात प्राण्यांना असे पदार्थ खायला द्या ज्याने त्यांना थंडावा जाणवेल. यात फळे उत्तम पर्याय असेल. कलिंगड, द्राक्षे, केळी अशी फळे तुम्ही पेट्सना देऊ शकता. हवे असल्यास उन्हाळ्यात आहाराविषयी तुम्ही एकदा तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता. या दिवसात प्राण्यांना चिकन, मटण सारखे मांसाहारी पदार्थ खायला देऊ नये कारण या पदार्थानी उष्णता वाढते.

अंघोळ (Bath)

अंघोळीने जसे आपल्याला फ्रेश वाटते तसेच प्राण्यांनाही वाटते. अंघोळ केल्याने प्राण्यांना थंड वाटते शिवाय त्यांचे शरीरही थंड होते. प्राण्यांना नियमित अंघोळ घातल्यास त्यांच्या शरीरावरील घाण निघून जाते आणि कोणत्याही प्रकारचे त्वचेचे संक्रमण होत नाही.

- Advertisement -

उन्हात घेऊन जाऊ नका ( Do not take pets out in heat) 

प्राण्यांना तीव्र उन्हात घेऊन जाऊ नका. यामुळे उष्माघातापासून त्यांचे संरक्षण होईल. याशिवाय त्यांना बाहेर नेताना पाणी अवश्य सोबत ठेवा.

पंज्यांची काळजी घ्या ( Take Care of claws) 

उन्हाळ्यात रोड, फुटपाथ गरम असतात. अशा परिस्थितीत त्यांचे पंजे भाजू शकतात. त्यामुळे त्यांना उन्हातून फिरवून आणल्यानंतर पाम बाम लावू शकता.

वाहनात बंद करू नका (Do not lock pets in vehicle)

अनेक जणांना सवय असते बाहेर गेल्यावर प्राण्यांना बंद गाडीत लॉक करायची. अशाने कारच्या हिटमुळे प्राण्यांना त्रास होऊ शकतो. यावर सोप्पा उपाय म्हणजे त्यांना तुमच्यासोबत घ्या, सोबत शक्य नसल्यास घरीच ठेवा.

रोगांपासून संरक्षण महत्वाचे (Protest again Diseasees)

उन्हाळ्यात टीका आणि पिसू सारखे कीटक प्राण्यांना त्रास देऊ शकतात. यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने टिक्स स्प्रे वापरू शकता.

 

 

 

 


हेही पहा : तुम्हीही पाळीव प्राण्यांसोबत झोपता?, जाणून घ्या परिणाम

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini