Monday, January 20, 2025
HomeमानिनीPet care tips : दिवाळीत प्राण्यांची घ्या अशी काळजी

Pet care tips : दिवाळीत प्राण्यांची घ्या अशी काळजी

Subscribe

दिवाळीचा सर्वत्र उत्साह दिसत आहे. दिवाळी म्हटले की रोषणाईसोबत फटाके सुद्धा आले. फटाक्यांच्या आवाजाशिवाय दिवाळी अपूर्ण मानली जाते. खरं, प्रदूषणाच्या दृष्टीकोनातून फटाके फोडणे योग्य नसते. फटाक्यांच्या आवाज आणि धूर यामुळे केवळ आपल्यालाच नाही तर प्राण्यांनाही त्रास होतो. अशा परिस्थितीत तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी चिंतीत असाल तर अजिबात काळजी करू नका. आज आम्ही अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही प्राण्यांची काळजी घेऊ शकाल,

खिडक्या – दारे बंद ठेवा

दिवाळीत फोडणाऱ्या फटाकांच्या आवाजामुळे घरातीलच नव्हे तर बाहेरील भटक्या कुत्र्यांनाही त्रास होतो. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना घरातच ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास घराचे दारे- खिडक्या बंद ठेवण्याचा प्रयन्त करा.

आवाजापासून लांब ठेवा

पाळीव प्राणी फटाकांच्या आवाजाने घाबरतात. अशा वेळी त्यांना आवाजापासून लांब ठेवा. तसेच या आवाजांपासून त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही घरात गाणी किंवा टि:व्ही लावू शकता.

सतत पाणी द्या

दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या आवाजामुळे पाळीव प्राणी घाबरतात. प्राणी घाबरल्यावर त्यांची चिडचिड होते आणि त्यांच्या शरीराचे तापमान वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना पाणी पाजत राहा.

एकटे ठेवू नका 

फटाकांच्या आवाजामुळे प्राणी घाबरेलेले असतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना एकटे सोडू नका, ज्यामुळे ते घाबरणार नाहीत .

अॅटी एन्झायटी इजेक्शन 

डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातील प्राण्याला दिवाळीआधी अॅटी एन्झायटी इजेक्शन अवश्य द्या. अॅटी एन्झायटी इजेक्शन दिल्याने प्राणी फटाक्यांच्या आवाजाने घाबरणार नाहीत.

 

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini