उन्हापासून दिलासा देणारा पाऊस सर्वांचा आवडतो. पण, हाच पावसाळा अनेक आजारांना सोबत घेऊन येतो. अशावेळी स्वतःसोबत तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांची देखील काळजी घ्यायला हवी कारण माणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांनाही संसर्गजन्य आजारांचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही तुमच्या पेट्सची काळजी कशी घ्यायची ते जाणून घेऊयात,
- पावसाळ्यातील वातावरण दमट असते, त्यामुळे सर्वत्र ओलसरपणा असतो. ओलसरपणा पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो. त्यामुळे घरातील पेट्सना ओलसरपणा असेल तिथे ठेऊ नका. त्यांना कोरड्या आणि स्वच्छ जागीच ठेवा.
- पाळीव प्राण्यांनाही पावसाळ्यात त्वचेची समस्या उद्भवू शकते कारण पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळे गोचीड आणि पिसूंची वाढ मोठ्या प्रमाणात होते. यामुळे आवश्यक असणाऱ्या सर्व लस त्यांना द्यायला विसरू नका. प्राण्याला स्किन इन्फेक्शन झाले असेल तर वेळ न दवडता पशुवैद्याकडे त्वरित घेऊन जा.
- पाळीव प्राण्यांना बाहेरून आल्यानंतर कॉटन टॉवेलने स्वच्छ पुसून घ्या आणि झोपण्यासाठी उबदार कापड द्या. ज्याने त्यांना कोणतेही इन्फेक्शन होणार नाही. जर ते केसाळ असतील तर वेळेवर ग्रूमिंग करा.
- पोषक आहार द्या. पचण्यास हलके पदार्थ आणि पाणी सुद्धा उकळूनच द्या कारण दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजार होऊ शकतात.
- लेप्टोस्पायरोसिस हा पावसाळ्यात होणारा सामान्य आजार आहे. त्यामुळे पशुवैद्यकाच्या मदतीने प्राण्याचे लसीकरण करून घ्या.
- यासह पाळीव प्राण्याची जेवणाची आणि पाणी पिण्याची भांडी नियमितपणे स्वच्छ करा.
- पावसाळ्यात पाळीव प्राण्यांना नियमित अंघोळ घाला. अंघोळ झाल्यावर कोरड्या कपड्याने पुसून घ्या. ज्याने ते ओले राहणार नाहीत आणि त्यांना स्किन इन्फेक्शन होणार नाही.
- पावसाळ्यात प्राण्यांना बाहेर फिरायला घेऊन जाता येत नाही. पण, अशाने सतत घरी राहिल्याने प्राण्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. अशावेळी त्यांना घरातच खेळण्यासाठी तुम्ही जागा तयार करू शकता.
- बाहेर नेणार असालच तर आल्यावर त्यांचे पंजे साफ करण्यास विसरू नका.
हेही पाहा :
Edited By – Chaitali Shinde