हिवाळ्यातील गुलाबी थंडी अनेक आजार सोबत घेऊनच येते. त्यामुळे या ऋतुत आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टर देतात. केवळ आपणच नाही तर घरातील पाळीव प्राण्यांची काळजी सुद्धा घेणे आवश्यक आहे. कारण हिवाळ्यात प्राणी आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. असे म्हणतात की, कुत्रे आणि मांजरीच्या अंगावरील केस त्यांचे थंडीपासून संरक्षण करतात. पण, पूर्णपणे करू शकत नाही हेही आपण लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे जाणून घेऊयात, हिवाळ्यात प्राण्यांची काळजी कशी घ्यावी.
गरम पाण्याने आंघोळ –
माणंसाप्रमाणेच प्राण्यानांही थंडी लागते. त्यामुळे प्राण्यांना आंघोळ घालताना थंड पाण्याऐवजी गरम पाण्याचा वापर करावा. पण, जास्तप्रमाणातही गरम पाणी वापरू नये नाहीतर त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ घालू शकता.
उबदार जागा –
घरातील पेट्स कुठेही झोपतात. अनेकदा तर फरशीवर झोपलेले आपण त्यांना पाहतो. पण, थंड फरशीवर झोपून पेट्स आजारी पडू शकतात. अशावेळी तुम्ही त्यांना उबदार बिछाना द्यायला हवा. यासह ब्लॅकेटसुद्धा द्यायला हवेत.
स्वेटर –
थंडीत पेट्ंसना वॉकला नेताना स्वेटर किंवा लोकरीचे जॅकेट घालायला हवेत. या कपड्यांमुळे त्यांना थंडीचा त्रास होत नाही.
औषधे –
हिवाळ्यात प्राण्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे प्राण्यांच्या लसीकरणाकडे अवश्य द्यायला हवे. तसेच कोणतीही औषधे सुरू असतील तर त्यात खंड पडू देऊ नका.
वॉकची वेळ –
साधारण: पेट्सना वॉकला घेऊन जाताना सुर्यप्रकाश असेल याची खात्री बाळगा. सुर्यप्रकाशात व्हिटॅमिन D असते, ज्यामुळे हाडे निरोगी राहतात.
पाणी –
हिवाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी वेळोवेळी त्यांना पाणी देत राहा. पाणी देताना थंड देऊ नये, त्याऐवजी कोमट पाणी द्यावे.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde