Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Beauty पिगमेंटेशनची समस्या दूर करण्यासाठी हळदीत मिक्स करा 'या' गोष्टी

पिगमेंटेशनची समस्या दूर करण्यासाठी हळदीत मिक्स करा ‘या’ गोष्टी

Subscribe

आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि डाग येणे कोणालाही आवडत नाही. प्रत्येकाला आपल्या चेहऱ्याची त्वचा ही नितळ आणि पिंपल फ्री हवी असते. मात्र आजकालच्या लाइफस्टाइल आणि प्रदुषणाच्या कारणास्चव आपल्या स्किनवर पिगमेंटेशनची समस्या सुरु होते. यापासून दूर राहणे थोडे मुश्किलच असते. जर तुमच्या चेहऱ्यावर ते पसरले गेले तर तुमची स्किन निस्तेज दिसू लागते. तुम्ही सुद्धा पिगमेंटेशनच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर पुढील काही उपाय जरुर पहा.

हळदीचा फेस पॅक

- Advertisement -


त्वचेला चमकदार आणि क्लिअर बनवण्यासाठी हळदीचा वापर करू शकता. यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स-डाग दूर होण्यास मदत होते. याच्या मदतीने पिगमेंटेशनची समस्या ही दूर होऊ शकते.

हळदीचा फेस पॅक बनवण्यसाठी तुम्ही एका वाटीत हळदीची पावडर घेऊन त्यात मध मिक्स करुन एक पेस्ट तयार करा. हा पॅक चेहऱ्याला व्यवस्थितीत लावून 15 मिनिटे तरी तसाच ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनवेळेस या पॅकचा वापर तुम्ही करू शकता.

- Advertisement -

टोमॅटो बेसन फेस पॅक


टोमॅटो आणि बेसनचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने पिगमेंटेशनची समस्या दूर होऊ शकते. यामुळे चेहऱ्यावर होणारी टॅनिंग, डाग ही कमी होऊ शकतात. हा फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्ही टोमॅटोची पेस्ट घ्या आणि आता त्यामध्ये बेसन मिक्स करा. यामध्ये तुम्ही एलोवेरा जेल सुद्धा मिक्स करु शकता. हा पॅक चेहऱ्याला लावून 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. टोमॅटो बेसनचा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस चेहऱ्याला लावू शकता.


हेही वाचा- त्वचेच्या अनेक समस्यांसाठी तुळशीचे ‘हे’ 3 फेसपॅक नक्की ट्राय करा

- Advertisment -

Manini