स्किनवर ग्लो होण्यासाठी महिला विविध ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. मात्र या ब्युटी प्रोडक्ट्समुळे काहीवेळेस एलर्जी होते. अशा प्रोडक्ट्समध्ये खुप केमिकल असल्याने त्यामधील प्रोडक्ट्स आपल्या स्किनला नुकसान पोहचवतात. अशातच गरजेचे आहे की, घरगुती उपचार करणे. आपल्या घरातील किचनमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या खाण्यासह स्किन केअरसाठी सुद्धा वापरल्या जातात.
त्यापैकीच एक म्हणजे राईस वॉटर. आपण राइस वॉटर काय कामाचे म्हणून ते फेकून देतो. परंतु स्किन केअरसाठी हे व्यवस्थितीत काम करते. पिंपल्स ते सन टॅनिंगसाठी फायदेशीर ठरते.
– राईस वॉटर टोनर
एक कप तांदूळ घ्या आणि व्यवस्थितीत धुवा. जेणेकरुन त्यामधील अस्वच्छता दूर होईल. धुतलेले तांदूळ एका वाटीत घेऊन त्यात पाणी टाका. तांदूळ पाण्यात 15-20 मिनिटे असेच ठेवा. जेणेकरुन पोषक तत्वे पाण्यात मिळतील. त्यानंतर तांदूळ पाण्यातून बाहेर काढा आणि त्याचे पाणी एका बॉटलमध्ये काढून ठेवा. अशा प्रकारे राईस वॉटर टोनर तयार होईल.
– राईस वॉटर मास्क
राईस वॉटर मास्क बनवण्यासाठी राईस वॉटरला तांदळाच्या पीठासोबत मिळून मिक्स करू शकता. पेस्ट डोळे आणि तोंडापासून दूर ठेवा. जवळजवळ 20 मिनिटांपर्यंत सुकू द्या आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.
-पिंपल्ससाठी राईस वॉटर
जर तुमची त्वचा तेलकट आणि एक्ने प्रोन असेल तर पिंपल्सपासून आराम मिळतो. राइस वॉटरमध्ये स्टार्च असते, जे पोर्स मधील अस्वच्छता आणि सीबम स्वच्छ होते.
-सनबर्न पासून दूर राहता
राईस वॉटरचा वापर केल्याने तुम्ही सनबर्नच्या समस्येपासून दूर राहू शकता. यासाठी राइस वॉटर कॉटन बॉलचा वापर करून चेहऱ्यावर लावा.
-डार्क स्पॉटसाठी राईस वॉटर
राईस वॉटरचा वापर डार्क स्पॉट किंवा पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा. चेहऱ्यावरील काळे डाग किंवा हाइपरपिंगमेंटेशनच्या येथे लावा. नियमित याचा वापर केल्याने काळे डाग दूर होण्यास मदत होईल.
हेही वाचा- चेहऱ्यावरील ब्लाइंड पिंपल्स असे करा दूर