पितृपक्षात ‘या’ सात ठिकाणी श्राद्ध केल्यास मिळते पुण्य!

असे काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी जाऊन श्राद्ध केल्यास खूप पुण्य मिळते. त्यासोबतच पुर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. तुम्हाला माहित आहे का? कोणत्या आहेत त्या जागा...

श्राद्ध करणं म्हणजे आपल्या देवता, पित्र आणि आपल्या पुर्वजांच्या निमित्ताने श्राद्ध केले जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार पिंडदान करून मोक्ष प्राप्ती केली जाते. श्राद्ध केल्यास पुर्वाजांना मुक्ती मिळते, असे म्हटले जाते. देशात तसे अनेक ठिकाणं आहे त्या ठिकाणी जाऊन पिंडदान केले जाते. मात्र, असे काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी जाऊन श्राद्ध केल्यास खूप पुण्य मिळते. त्यासोबतच पुर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. तुम्हाला माहित आहे का? कोणत्या आहेत त्या जागा…

गया

बिहारच्या फल्गूच्या किनाऱ्यावर असलेल्या गया या ठिकाणी जाऊन पिंडदान करून श्राद्ध करण्याचे वेगळे महत्त्व मानले जाते. असे म्हटले जाते की, भगवान राम आणि देवी सीता यांनी राजा दशरथ यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी गया याठिकाणी पिंडदान केले होते. गया या ठिकाणाला विष्णुचे नगर मानले जाते.गया या ठिकाणाला मोक्ष भूमी देखील म्हटले जाते.

हरिद्वार

हरिद्वारच्या शिलावर अर्पण केल्याने पित्रांना मोक्ष मिळते, असे मानले जाते. यासंदर्भातील उल्लेख पुराणामध्ये देखील पाहायला मिळतो. देशभरातील श्रद्धाळु लोक या ठिकाणी येऊन आपल्या पुर्वजांना शांती मिळावी म्हणून तेथे पूजा- अर्चना करतात.

वाराणसी

भगवान शिवाची पवित्र नगरी म्हणून वाराणसीला संबोधले जाते. खूप लांबून-लांबून लोक येऊन याठिकाणी आपल्या पुर्वजांचे पिंडदान करतात. बनारसच्या काही घाटावर देखील अस्थि विसर्जन आणि श्राद्धाचे विधी केले जातात.

बद्रीनाथ

चार धाम पैकी एक असणारे बद्रीनाथ हे श्राद्धाच्या विधी पूजेकरिता महत्त्वाचे मानले जाते. बद्रीनाथच्या ब्रम्हकपाल घाटावर श्रद्धा असणारे अनेक जण मोठ्या संख्येने पिंडदान करतात. या ठिकाणी उगम पावणारी अलकनंदा नदीवर पिंडदान केले जाते.

इलाहाबाद

इलाहाबाद येथील असणाऱ्या संगमावर पिंडदान करणं सर्वोत्तम मानले जाते. तसेच या ठिकाणी पिंडदान करण्याचे वेगवेगळे महत्त्व आहे. इलहाबादमधील पितृपक्षात मोठी जत्रा भरवण्यात येते.

मथुरा

भगवान कृष्ण मथुरेत जन्माला आले होते.. त्यामुळे मथुरेचे मोठे महत्त्व मानले जाते. मथुरेत भगवान कृष्णांचे अनेक धार्मिक स्थळे देखील प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देखील पिंडदान केले जाऊन त्यांना मोक्ष प्राप्त करून प्रसन्न केले जाते.

जगन्नाथ पुरी

चार धाम यात्रेपैकी जगन्नाथ पुरीची यात्रा केल्याने पुण्य मिळते. या ठिकाणी पुर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पूजा-पाठ केले जाते. पुरी शहरात पिंडदान करण्याला वेगळेच महत्व असल्याचे मानले जाते.