Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर लाईफस्टाईल पिझ्झा, बर्गर, पास्ताने शरीरावर होतोय घातक परिणाम

पिझ्झा, बर्गर, पास्ताने शरीरावर होतोय घातक परिणाम

जाणून घ्या मैद्याच्या सेवनाने शरीरावर होणारे दुष्परिणाम.

Related Story

- Advertisement -

सध्याच्या काळात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही भाकरी, चपाती, पोहे, शिरा किंवा उपमा खाता का? असे विचारल्यास नाक मुरडली जातात. मात्र, त्याचवेळी जर पिझ्झा, बर्गर, पास्ता खाता का?, असे विचारल्यास तोंडाला लगेच पाणी सुटते. पण, हे चमचमीत, लज्जदार पदार्थ कितीही खावेसे वाटले तरी मात्र, त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. हे पदार्थ शरीरासाठी प्रचंड घातक असतात. कारण हे सर्व पदार्थ मैद्यापासून बनवले जातात. मैद्याचे पदार्थ बनवायला सोपे आणि खाण्यासाठी लज्जदार असले तरी देखील ते शरीरासाठी घातक आहेत. यामुळे शरीरावर कोणता परीणाम होतो जाणून घेऊया.

पोटाचे विकार

मैदा हा चिकट पदार्थ असतो. त्यामुळे मैद्यापासून बनणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास ते पदार्थ आतड्यांना चिकटतात. तसेच मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटाचे आजार सुरु होतात.

वजन वाढतं

- Advertisement -

लहान मुलं सगळेच पदार्थ पचवू शकत नाहीत. त्यांची वाढ ही त्यांच्या पोषक घटकांवर अवलंबून असते. तसेच मुलांची चरबी ही ५ वर्षानंतर वाढायला लागते. त्यामुळे मुलांनी मैदाचे पदार्थ खाल्ले तर त्याची चरबी बनते. त्यामुळे कमी वयातच जास्त वजन वाढायला लागते. मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे लहान मुलांचे वजन वाढण्याची भीती ९८ टक्के आहे.

रोग प्रतिकारशक्ती होते कमजोर

मैद्याच्या पदार्थांपासून पोषक घटक मिळत नाहीत. तर उलट मुलांची रोग प्रतिकारशक्ती कमजोर होते. यामुळे लहान वयात मधुमेह, थायरॉइड यासराखे आजार डोकं वर काढतात. तसेच लहान मुलींना पाळी संदर्भात देखील त्रास उद्भवतात.

उंचीच्या वाढीवर परिणाम

- Advertisement -

मुलांची शारीरिक वाढ योग्य पद्धतीने होणे फार गरजेचे असते. कारण मुलांची उंची काही ठराविक काळापर्यंतच वाढतो. त्यामुळे लहान वयात मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे त्याचा शरीरावर परिणाम आणि मुलांची उंची खुंटते.

शुगर वाढते

मैद्यात हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतात. त्यामुळे मैद्याचे सेवन केल्याने शुगर लेव्हल वाढते.

कोलेस्ट्रॉल वाढत

मैद्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असते. त्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईडची पातळी वाढते.

गरोदर महिलांसाठी अपायकारक

मैदा बनवतानाा सोडीअम मेटा बिसल्फेट आणि बेंझॉइक acidचा वापर केला जातो. ज्यामुळे गरोदर महिला आणि लहान मुलांना मैदा अपायकारक ठरतो.


हेही वाचा – NationalEggDay2021:अंडी खा तंदुरुस्त राहा,सुदृढ आरोग्याकरीता अंड्याचे महत्व जाणून घ्या


 

- Advertisement -