घरलाईफस्टाईलघरच्या घरी बनवा 'पिझ्झा सॉस'

घरच्या घरी बनवा ‘पिझ्झा सॉस’

Subscribe

'पिझ्झा सॉस' रेसिपी

बऱ्याचदा पिझ्झा बनवण्यासाठी पिझ्झा सॉसची आवश्यकता लागते. मात्र, तो आपण बाजारातून विकत घेऊन येतो. पण, आता तुम्ही बाजारातून न आणता घरच्या घरी ‘पिझ्झा सॉस’ नक्की बनवू शकता. याचीच आज आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवणार आहोत.

साहित्य

  • २ कप टोमॅटो प्युरी
  • चवीनुसार मीठ
  • टोमॅटो कॅचअप- ½ कप
  • तिखट २ चमचे
  • लसूण ५ पाकळ्या
  • गरम मसाला २ चमचे
  • १ बारीक कांदा चिरलेला

कृती

सर्वप्रथम गरम पॅनमध्ये २ चमचे ऑलिव्ह ऑयल टाका आणि त्यात लसणाच्या पाकळ्या परतून घ्या. नंतर कांदे घालून परता. आता टोमॅटो प्युरी घालून एकजीव करुन घ्या. टोमॅटोचे पाणी शोषून गेल्यावर मीठ आणि तिखट मिसळा. गरम मसाला घालून केचअप टाका. ३-४ मिनिटे परतून घ्या. नंतर गॅस बंद करा, अशाप्रकारे घरच्या घरी ‘पिझ्झा सॉस’ तुम्ही अगदी सहज बनवू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -