घरात लावलेली झाडं आपल्या काही समस्या दूर करतात. अशातच बहुतांशजण घरात झुरळं झाल्याची तक्रार करतात. कितीही पेस्ट कंट्रोल केले तरीही ती पुन्हा येतात. यावर उपाय म्हणजे तुम्ही घरी काही अशी झाडं लावा त्यामुळे ती दूर पळतील.
-कडुलिंबाचे झाड
कडुलिंबाचे झाड लावल्यास घरातील झुरळं पळून जातील. खरंतर कडुलिंबाची पान झुरळांना अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे तुम्ही कडुलिंबाची पान घराच्या खिडक्या, दरवाज्या येथे ठेवू शकता.
-लसणाचे झाड
जेव्हा तुम्ही लसणाचे झाड लावले तर घरातील झुरळ दूर पळतील. लसणाचा वास झुरळांना आवडत नाही. यासाठी लसणाच्या पाकळ्यांचा स्प्रे तयार करू शकता.
-लेवेंडरचे झाड
लेवेंडरचा वास झुरळांना अजिबात आवडत नाही. याचे इसेंशियल ऑइल ही वापरू शकता. ज्या ठिकाणी झुरळं अधिक येतात तेथे तुम्ही ते स्प्रे करू शकता.
-कॅमोमाइल
कॅमोमाइजचा गंध हा झुरळांना आवडत नाही. याची फुल घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा अथवा त्याचे तेल कोपऱ्यांमध्ये स्प्रे करा.
-पुदीना
पुदीन्याचा गंध ही झुरळांना आवडत नाही. यामुळे पुदीन्याचे प्लांट घराच्या कोपऱ्यात ठेवू शकता.
हेही वाचा- ‘या’ झाडांमुळे कबुतरे राहतील घरापासून लांब